या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नजरेने पाहाणार ! हे त्यांचे कर्तव्यच आहे. आणि समजा रुसले तरी ते काय करणार ? गप्पच बसणार की नाही ! सूड घेणे त्यांना शोभणार नाहीच. माझ्या पाहाण्यात अशी मंडळी आहेत ज्यांनी खांडेकरांच्या स्वप्नाळू मनोवृत्तीचा अधिक्षेप करण्याची संधी कधी गमावली नाही पण आपल्या पुस्तकाची, भलावण करणारी प्रस्तावना मात्र त्यांनी लिहिलीच पाहिजे असा आग्रह धरला. असेही समीक्षक आहेत की ज्यांनी जन्मभर खांडेकर म्हणजे कृत्रिम, नकली व हीणकस असा घोष वर्षानवर्षे केला पण आपल्या सत्काराला अध्यक्ष तेच हवेत ह्यावर हट्ट धरला. खांडेकरांनी आपला मोठेपणा सांभाळलाच पाहिजे. आम्ही त्यांच्या मोठेपणाची बूज ठेव अगर ठेवणार नाही पण त्यांनी मात्र त्याना शोभलसे वागले पाहिजेच. आमच्यासारखे वाग नये असे संकेतच जणू ठरल्यासारखे होते.
 ह्या माणसाविपयी प्रेम सर्वांनाच होते. पण त्यांच्या वाङमयाविषयी समीक्षकांची प्रतिकल बद्धी कायमची राहिली. ज्या काळात गडकरी हे चलते नाणे होते, लेखक अलंकारिक व अनुप्रासयुक्त शैलीचा वापर करण्यात आनंद मानीत त्याही वेळी खांडेकरांना कृत्रिम, अलंकारिक, अतिशय खोटे व उथळ चित्रण करणारे, भाबडे लेखक असेच म्हटले गेले. तो काळ वाङमयात तंगवादाच्या गौरवाचा होता. त्याही काळी फडके ह्यांच्या शैलीचा गौरव करीत समीक्षकांनी खांडेकरांना नकली व कृत्रिमच ठरविले. आणि ज्या काळात महायुद्धोत्तर वाङमयाचे नवे युग आले तेव्हा तर फारच मौज दिसू लागली टीकाकार यग फडक्यांचे मानत व दोष खांडेकरांचे सांगत. मराठी समीक्षक खांडेकरांच्या नेहमी विरोधात राहिले. त्यांची भाषाशैली कृत्रिम व आलंकारिक आहे, हा कायमचा आक्षेप राहिला. गडकन्यांच्या चाहत्या एका समीक्षकाने आपले असे मत नोंदविलेले आहे की, गडक-यांच्या कोट्या शंभराव्या वाचनात सुद्धा आनंद देतात, खांडेकरांच्या कोटया पहिल्या वाचनात सुद्धा वाचवत नाहीत. खांडेकरांना निसर्ग वर्णने जमत नाहीत, संवाद जमत नाहीत, व्यक्तिदर्शन तर जमतच नाही. त्यांची कथानक रचनाच सदोष असते. जीवनदर्शन खोटे असते. त्यांची भूमिका उथळ व स्वप्नाळू असते. असे अनेक आक्षेप भाऊसाहेबांच्या वाङमयावर आहेत. गेली पंचेचाळीस वर्षे हे आक्षेप पुनः पून्हा अनेकांनी उगाळलेले आहेत आणि तरीही प्रकाशक त्यांचे वाङमय छापण्यास उत्सुक असत. वाचक वाचण्यास उत्सुक असत.

 ह्या समीक्षकांनी काही प्रश्न स्वतःला कधी विचारलेच नाहीत. खांडेकर कादंबरीकार म्हणून उदयाला आले, तेव्हा फडके ह्यांची कादंबरी लोकप्रिय होती. फडके ह्यांच्या सार्वत्रिक प्रतिष्ठेचा व लोकप्रियतेचा खांडेकरांना

ओळख