या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोल्हटकर हे कल्पक खरे पण ती कल्पकता संविधानक रचनेची नव्हती, निसर्गातील सौंदर्य प्रतिमाबद्ध करणान्या कवीची नव्हती, भावगर्भतेला अधिक गाढ करणाऱ्या रससिद्धाची नव्हती, विसंवाद-औचित्यभंग अपेक्षाभंग ह्यासाठी साम्य-वैषम्य शोधणान्या चेष्टेखोराची ती कल्पकता होती. तिला विनोदातच मोकळा वाव होता.
 करंदीकरांनी कोल्हटकरांच्या महाराष्ट्रगीताची व वंदेमातरम् ह्या राष्ट्रगीताची केलेली तुलनाही अशीच मार्मिक आहे. ह्या पुरोगामी पंडिताला महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या आकांक्षा समरसून कधी आकलनच करता आलेल्या नाहीत, असा टोला ह्या गीतावर ते हाणतात. महाराष्ट्रगीतात ज्ञानेश्वरच विसरून राहिला हेही ते सांगतात. कोल्हटकरांच्या वाङमयातील उणिवा दाखविणे सोपे आहे. ह्या उणिवांची संगती लावून देणे, त्यांचा उलगडा करून दाखविणे अतिशय कठीण आहे. त्यांच्या इतर वाङमयाप्रमाणेच समीक्षेला व विनोदालाही हाच नियम लागू होतो. अगदी विनोदी लिखाण घेतले तरी त्यात पांडूतात्या, बंडूनाना व सुदामा ह्या त्रयीला मूर्ख, हास्यास्पद ठरविणेही त्यांना अपेक्षित असते व ह्या मूर्ख, हास्यास्पद मंडळींना जिज्ञासू, चौकस व माहितगार ठरविणेही त्यांना भाग असते. जर ही माणसे चौकस जिज्ञासू नसतील तर मग विविध माहितीचा बारकावा देता येत नाही. आणि मूर्ख नसतील तर हास्यास्पद करता येत नाही. मुखांना हास्यास्पद करून आपण हिंदू धर्मातील अंधश्रद्धा हास्यास्पद करू शकतो काय ? हाही एक प्रश्नच आहे. कारण अंधश्रद्धा जाणत्या-शहाण्या-विचारी माणसांच्या मनातही वळटपणे वावरत असते व तेच तिचे सामर्थ्य असते.

 परंपरागत समाजरचना बदलण्याचे ध्येय जर खरोखरी कोल्हटकरांना आकलन झाले असते तर कदाचित त्यांच्या विनोदाचा नसता आशय बदलला नसता, सगळी अभिव्यक्तीच बदलली असती. करंदीकरांनी यवतमाळ संमेलनाचे प्रसंगी माझ्यासमोर मांडलेला पण ह्या ग्रंथात न आलेला एक मुद्दा मांडन मी थांबणार आहे. सामान्यपणे कोल्हटकर हे कलावादी मानले जातात. त्यांचे प्रमख शिष्य कलावादी नसून जीवनवादी आहेत. मामा वरेरकर तर आग्रही जीवनवादी आहेत. ते स्वतःला अनेकदा नसते जीवनवादी म्हणवन न घेता प्रचारक व प्रचारवादीही म्हणवून घेतात. खांडे कर जीवनवादी समीक्षक म्हणनच प्रसिद्ध आहेत. भाऊसाहेब माडखोलकरांनी स्वतःला आल्हादपंथीय मानले तरी त्यांना कुणी कलावादी समजत नाही. ह्या विसंगतीचे कारण काय ? एका बाजूने पाहावे तो प्रो. फडके ह्यांच्या कलावादी भूमिकेतील ( खरे म्हणजे तंत्रवादी भूमिकेतील) सर्व मुद्दे कोल्हटकरांनी आधीच मांडलेले दिसतात. दुसऱ्या बाजूने पाहावे तो

११२

ओळख