या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकसाहित्याचे अंतःप्रवाह




 माझे मित्र डॉ. प्रभाकर मांडे यांचे लोकसाहित्याचे अंतःप्रवाह हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकाने मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासकांत अजून एका नावाची भर पडलेली आहे. मराठीत लोकसाहित्याचे संग्राहक, संकलक आणि संपादनकार यांची संख्या जरी वरीचशी असली तरी या क्षेत्रात विवेचनात्मक अभ्यास ही फार मोठी उणीव आहे. युरोपीय वाङमय जरी बाजूला ठेवून दिले आणि भारतापुरता विचार केला तरी हिंदीच्या मानाने मराठीत लोकसाहित्याचा विवेचनात्मक अभ्यास अतिशय अल्प आहे. ग्रंथरूपाने हा अभ्यास एकत्रितपणे समोर येण्याचा योग अधिकच दुर्मिळ आहे. सुमारे २० वर्षापूर्वी दुर्गावाई भागवत यांनी 'लोकसाहित्याची रूपरेखा' हा विवेचनात्मक ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतर प्रभाकर मांडे यांचा दुसरा ग्रंथ प्रकाशित होत आहे. आज तरी मराठीत लोकसाहित्यावरील विवेचनात्मक ग्रंथ असे हे दोनत्र आहेत.

  लोकसाहित्याची रूपरेखा हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळी मी त्या ग्रंथाचे सविस्तर असे परीक्षण केले होते. दुर्गाबाईंच्या अध्ययनाचे क्षेत्रही मोठे आणि त्यांच्या विवेचनाचा एकूण अवाकाही मोठा यात वाद नाही. पण दुर्गाबाईंच्या ग्रंथापेक्षा डॉ. मांडे यांच्या ग्रंथाची मांडणी संपूर्णपणे निराळी आहे दुर्गाबाईंनी प्रामुख्याने शब्द या माध्यमातून अभिव्यक्त झालेल्या लोकसाहित्याचा विचार केला आहे. म्हणून त्या वेगवेगळया कथा, उखाणे, वाक्संप्रदाय आणि गीते यांचा विचार करतात. साहित्य हा शब्द त्यांनी प्राधान्याने शब्दबद्ध साहित्य असा गहीत धरून भारताच्या सर्व इतिहासात त्या साहित्यरूपांचा

ओळख

१३१