या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ. ७० ते ८८ अशी १९ अध्यायात पसरलेली आहे. (प्रत भांडाराकर संस्थेची). मळ महाभारतात ययातीच्या कथेला उपाख्यान म्हटलेले आहे. ययातीचा उल्लेख महाभारतात एक सम्राट म्हणून येतो. ऋग्वेदातही ययातीचा सूक्तद्रष्टा म्हणून उल्लेख आलेला आहे. महाभारत काळी सुद्धा ययातीची कहाणी दोन भिन्न परंपरांनी ज्ञात असलेली दिसते. ह्या दोन परंपरांमध्ये घटनांचे फरक आहेत पण त्यामुळे आशयात फार मोठा फरक पडत नाही. ययातीचा वेदांचा अभ्यास प्रसिद्ध होता. त्याची तत्त्वज्ञानाबद्दलही ख्याती होती. प्रतिष्ठानपुरीचा हा राजा वेदज्ञ म्हणून ओळखला जाई. (१/७६ / १३). त्याचा उल्लेख करताना सम्राट सत्य पराक्रम, अपराजित ही विशेषणे लावलेली आहेत. (१ / ७० / २९, ३०). कथेच्या एका परंपरेप्रमाणे ययाती मृगया करताना थकून गेलेला असता पाणी पिण्यासाठी एका विहिरीजवळ गेला. तो त्याला विहिरीत एक स्त्री पडलेली दिसली. ययातीने हात देऊन त्या स्त्रीला बाहेर काढले. ती देवयानी होती. असुरांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा हिने असुर गुरू शुक्राचार्यांच्या या एकुलत्या एक कन्येला विहिरीत ढकलन दिलेले होते. देवयानीने राजास पाणिग्रहण करण्याची विनंती केली व ह्या विवाहास आपल्या तपस्वी पित्याची संमती मिळविण्याचाही पत्कर घेतला. ह्या कथा परंपरेप्रमाणे ययाती-देवयानीची भेट शर्मिष्ठा दासी होण्यापूर्वी होते. आणि ययाती देखण्या संदरीवर भाळत नसून देवयानी पुढाकार घेऊन आपले लग्न ठरविते. पूराण कथांमध्ये तरुणींनी पुढाकार घेतल्याच्या कथा खूप आहेत. हा त्या प्रथेतील एक प्रसंग समजावयाचा.

 कथेच्या दुसन्या परंपरेनुसार मिष्ठा दासी झाल्यानंतर देवयानी मिष्ठेसह वनविहार करीत होती. तिथे ययातीला ती दिसली. तिथे देवयानीने आपला परिचय करून दिला व विवाहाचा प्रस्ताव मांडला. ह्याही परंपरेत पुढाकार देवयानीचाच आहे. लंपट ययाती देखण्या स्त्रियांवर भाळतो व विवाहाचा प्रस्ताव मांडतो अशी रचना महाभारतात नाही. देवयानीने शमिष्ठेला दासी केले आहे. शर्मिष्ठाही एकटी दासी नसून, आपल्या सहस्र दासींसह ती दासी झालेली आहे. (१ । ७५ । १४,१९,२० ). आधुनिक मंडळींनी देवयानीच्या ठिकाणी मद्याचा अनिवार तिटकारा दाखविलेला दिसतो. तिला दारूचा वासही सहन होत नाही. भारतीय देवयानी मद्याचा आनंदाने आस्वाद घेणारी आहे (१।७६।३). तिला जीवनाच्या सर्व सुखांमध्ये रस दिसतो. ययाती प्रतिष्ठानचा राजा. विवाहानंतर देवयानी महाराणी म्हणून प्रतिष्ठानपुरास आली. तिच्यासह शर्मिष्ठाही आली. देवयानीने एका अशोकवनात शर्मिष्ठेला ठेवलेले आहे. अशोकवन ही उद्यानाची रमणीय जागा असे (१ । ७७ । २). देवयानीने मिष्ठेला आपल्या सेवेत ठेवून घेतलेले नाही. सतत तिचा अपमान

ओळख

२७