या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 द्रौपदी वस्त्रहरण ही महाभारतातील एखादी सूटी घटना नाही. अगदी आरंभापासून द्रोण्याचे शिष्य होण्याच्या पूर्वीपासून कौरव-पांडवांत वैर होते. या परस्पर वैमनस्यात कर्ण दुर्योधनाच्या बरोबर होता. महाभारतानुसार भीमाला विषान्न चारण्यात अनेकांच्या बरोबर-तोही सहभागी होता. पांडवांना हिणविण्यासाठी घोषयात्रेचा सल्ला देण्यात कर्ण अग्रेसर होता. प्रत्यक्ष रणमैदानावर अभिमन्यला सर्वांनी मिळन घेरण्यात व त्याचा रथ मोडून थकलेल्या जखमी अवस्थेत त्याला दुर्योधन पुत्रासमोर सोडण्यातही तो सहभागी होता. लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याचा जो कट होता त्यातही तो सहभागा असल्याचा पुरावा आहे. दुर्योधनाच्या सर्व पापांत तो सहभागी होता. म्हणूनच महाभारतात त्याला पापपूरुष आणि नीच म्हटले आहे. दुर्योधनाचा एकनिष्ठ मित्र इतकाच महाभारतात कर्णाचा सहभाग नाही. तो नुसता मित्र नाही. सब पापांचा सहभागी, पापकृत्यांचा सल्ला देणारा मित्र आहे. भीमाला विषान्न चारणे, लाक्षागृहात जाळन मारण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी विसरता आल्या असत्या, पण द्रोपदीवस्त्रहरणानंतर धर्मयुद्धाची अपेक्षा करणेच चूक होते. कौरवांनी मोठा धर्म पाळला असेही महाभारत म्हणत नाही. पांडवांनी धर्म पाळला असेही म्हणत नाही. शेवटी युधिष्ठिराचाही रथ जमिनीला टेकतो. प्रश्न फक्त तरतमभावाचा आहे. कर्ण हा पराक्रमी होता हे कधीच कुणी नाकारले नाही. पण पराक्रमी कर्णाचे पराभव झालेच नाहीत असे नाही. द्रौपदी स्वयंवर प्रसंगी त्याचा पराभव झाला. घोषयात्रेच्या वेळी त्याचा पराभव झाला. विराट गोग्रहणाच्या प्रसंगी त्याचा पराभव झाला. प्रत्यक्ष भारतीय युद्ध सुरू झाल्यानंतरही कर्णाचे अनेकदा पराभव झालेले आहेत. ज्यांनी कर्णाचे पराभव केले त्यात भीमही आहे. भीमाने केवळ कर्णाचे पराभवच केले नाहीत तर कर्णाच्या डोळ्यांसमोर दुःशासनाचा वधही केला आहे. लोक समजुतीनुसार दुःशासनाचा वध झालेला नाही. चिकित्सक आवृत्तीनुसार भीमाने दु:शासनाचे डोके तलवारीने उडवले. पराक्रमी पुरुषांचे कधी पराभवच होत नाहीत असे महाभारत समजत नाही. तिथे सर्वांचे पराभव आहेत. शिखंडीच्या आडन भीष्माला बाण मारणे हा तर अर्जुनाचा पराभव आहेच, पण वेळोवेळी द्रोणाला नमन करून पळणे हाही अर्जुनाचा पराभव आहे. आणि कर्णाला भय वाटतच नव्हते असेही नाही. कृष्णार्जुनाला पाहून भय वाटते हे रणमैदानावर कर्णाने कबूल केले आहे. (८-५७-४८) महाभारतातील पात्रे मानवी भावना आणि मानवी गुणदोष असणारी आहेत. त्यांचे एकपदरी वर्णन करण्यात अर्थ नाही.

 महाभारतात अनेक विसंवादी कथा आहेत. ज्याप्रमाणे महाभारतात विसंवाद आहे त्याप्रमाणे पुनरुक्ती आहे. एका कथेनुसार अंगदेशाचे राज्य

४७

ओळख