या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिला तर इतिहासात कर्ण नावाचा एक पराक्रमी योद्धा दुर्योधनाच्या बाजूने होता. तो पांडवांचा वडील भाऊ होता. दुर्योधनाकडून लढताना यद्धाच्या सतराव्या दिवशी मारला गेला एवढेच सत्य शिल्लक राहील. जन्मजात, कवचकुंडलदान, ब्राह्मणांचे आणि परशुरामाचे शाप, कृष्णकर्णाचे सवाल जबाब या बाबी इतिहासाच्या नसून त्या संस्कृतीच्या आहेत. इतिहासात ज्या घटना घडतात त्या संस्कृती एका विशिष्ट दृष्टीने स्वीकारीत असते. कर्णाच्या बलिदानाचा प्रश्न हा संस्कृतीचा प्रश्न आहे आणि तो भारतीय संस्कृतीच्या मूल्यव्यहाशी निगडीत असणारा भाग आहे. हा संस्कृतीचा प्रश्न दुहेरी आहे. ज्या संस्कृतीने ही महाभारतकथा सिद्ध केली तिचे काही प्रश्न आहेत. काही तुम्ही आम्ही जी मूल्ये मानतो त्यांचे प्रश्न आहेत.
 कौरवांचा नाश आणि पांडवांचा विजय ही घटना संस्कृतीसाठी दुष्टाचे दंडन व धर्मसंस्थापना यासारखी आहे. प्रत्यक्ष महाभारतातील कथाभाग राज्यावर कुणाचा हक्क होता याचे उत्तर देण्याच्या ठिकाणी अतिशय संदिग्ध आहे. कारण महाभारत ही सर्वांच्याच प्रदीर्घ वंचनेची कथा आहे. खरा गादीचा अधिकारी देवापी आहे. देवापी राज्य सोडून अरण्यात तप करण्यासाठी निघन जातो म्हणून शंतनू राजा होतो. आता गादीवर शंतनूचा वडील मुलगा म्हणजे भीष्माचा अधिकार आहे. म्हातारपणी शंतन ला विवाहाची वृद्धी होते आणि भीष्म कायमचा राज्यवंचित होतो. म्हणन हे राज्य विचित्रवीर्याला मिळते. विचित्रवीर्याच्या ठिकाणी अतिशय भोगलालसा आहे. त्यातच तो मरून जातो. त्याच्या पत्नीच्या ठिकाणी व्यास नियोग करतो. या नियोगामळे जन्मांव धृतराष्ट्र, जन्मरोगी पंडू जन्माला येतात. गादीला वारस अव्यंग मूल असावे म्हणून व्यासाला तिस-यांदा पाचारण करण्यात येते. तिथे सूना सत्यवतीची वंचना करतात. त्यातून विदूर जन्माला येतो. जन्मांध असल्यामळे धृतराष्ट्र गादीचा वारस नाही, जन्मरोगी असल्यामुळे पंड गादीचा वारस नाही. अशावेळी तरतमभावाने पंडूचा स्वीकार करून त्याला गादीचा वारसा दिला जातो. पण पंडूने गादीचा त्याग केला आहे. जन्मांध धृतराष्ट्राची पोरे पिताच गादीचा वारस नसल्यामुळे राज्याचे वारस नव्हत आणि पंडची मले पित्याने राज्यत्याग केल्यानंतर जन्माला आल्यामुळे गादीचे वारस नव्हत. भीष्म जिवंत असताना हस्तिनापूरची गादी कोणाची, यावर गौरवपांडवांचा वाद चाल आहे. अशी ही सगळीच वंचनेची कथा आहे. या कथेत अमक्याचा वारसा खरा हे पक्षपात बुद्धी बाळगल्याशिवाय सांगता येत नाही. खरे भांडण या वारसावर झालेले नाही.

द्रोपदी स्वयंवरानंतर राज्याचे दोन तुकडे झाले. त्या ठिकाणी एक प्रश्न

ओळख

५१