या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धीत


 व्हीनस प्रकाशन संस्थेचे संचालक पाध्ये यांनी आपल्या संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने एक चांगला संकल्प सोडलेला आहे. त्यानुसार दरसाल व्हीनस व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि नंतर ती व्याख्याने पुस्तक. रूपाने प्रकाशित होतात. विषयांच्या बाबतीत कोणतेही बंधन न घालता विविध प्रकारचे वैचारिक खाद्य समाजाला सातत्याने पुरविण्याचा हा एक संकल्प आहे. इतर अनेक व्याख्यानमालांपेक्षा अधिक चिकाटीने पाध्ये यांनी हा संकल्प अमलात आणलेला आहे. या व्याख्यानमालेत इ. स. १९७२ ची व्याख्याने म्हणन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तीन व्याख्याने दिली. या व्याख्यानांचे एक छोटेसे पुस्तक — आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत ' या नावाने प्रकाशित झालेले आहे. तर्कतीर्थांच्या लेखणीचा आणि वाणीचा हा एक विलोभनीय विशेष आहे, की ज्या क्षेत्रात ते संचार करतात तिथे इतरांना चिंतनाला कोणते तरी खाद्य पुरविल्याशिवाय परतत नाहीत. आणि साहित्य हा तर त्यांच्या अधूनमधूनच्या प्रवासाचा प्रदेश आहे. तर्कतीर्थ विचारांना खाद्य परवतात या विधानातच दोन बावी गृहीत धरल्या पाहिजेत. एक म्हणजे त्यांना काही तरी नवीन म्हणायचे असते आणि दुसरे म्हणजे हे त्यांचे प्रतिपादन नुसते नवीनच नसते तर पुष्कळदा विवाद्य असते. तर्कतीर्थांचा हा विशेष त्यांच्या काही व्याख्यानांत ठळकपणे नजरेस येतो ही आनंदाची गोष्ट आहे.

  कै. मढेकरांनी आपल्या विवेचनात असे एक विधान केलेले आहे की, मराठीचे टीकाशास्त्र बहुधा संस्कृत-परंपरेने आलेल्या रसव्यवस्थेच्या आश्रया

ओळख -५

६५