या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या संदर्भात विचार करणेच रसव्यवस्थेच्या चौकटीत मावणारे नाही. कारण रसव्यवस्थेचा हेतू एका कलाकृतीची वाङमयीन मीमांसा करण्याचा आहे. एका कलावंताच्या वाङमयीन प्रकृतीचा शोध त्या चौकटीत घेता येतच नाही. हे जसे एका कलावंताला लागू आहे त्याचप्रमाणे एका वाङमय प्रकारालाही लागू आहे. रसव्यवस्थेच्या चौकटीत एखाद्या वाङमयप्रकाराचे विवेचन करता येणेच अशक्य आहे. एखाद्या कालखंडातील सर्वच वाङमयाचे विवेचन करायचे म्हणजे एखाद्या कालखंडाचा वाङमयेतिहास लिहायचा म्हटले तरीही रसव्यवस्था अपुरी आहे. मढेकरांच्या डोळ्यांसमोर जी कोणती मराठी टीका होती तिच्यात वाङमयेतिहास होते, वाङमय प्रकारांचे आढावे होते, साहित्यिकांवरील ग्रंथ होते. कारण निदान फडके, खांडेकर, माडखोलकर, केळकर, वामन मल्हार यांचे तर समीक्षणात्मक लिखाण मढेकरांच्या समोर होतेच. हे सारे लिखाण समोर असून सुद्धा आणि ते संस्कृत रसव्यवस्थेला अनुसरून नाही हे डोळ्यांसमोर दिसत असूनसुद्धा मढेकरांची मराठी साहित्यसमीक्षा रसव्यवस्थेच्या अनुरोधाने बहुधा वावरत असते असे म्हटलेले आहे. या त्यांच्या म्हणण्याच्या मागे अभिप्रेतार्थ कोणता असावा हाच एक चितनीय प्रश्न आहे. गुण, अलंकार, रीती आणि रस फार तर औचित्यविचार यापलीकडे संस्कृत रसव्यवस्था जात नाही. हरिभाऊंनी आपल्या समाजाचे यथातथ्य चित्रण केले इतके म्हटले तरी समीक्षा रसव्यवस्थेच्या बाहेर जाते हे मढेकरांना अजीवात दिसत नव्हते असे मानण्याचे कारण नाही.

 म्हणनच मढे कर मराठी टीकाशास्त्र संस्कृत समीक्षेला अनुसरते असे न म्हणता त्या आश्रयाने वावरते असे म्हणतात. संस्कृत साहित्य समीक्षेचा गाभ्याचा महा रस हा आहे. जे रसात्मक असते ते ललित वाङमय. जे वाचकांच्या मनात रसनिर्मिती करू शकते ते साहित्य. अशाप्रकारे संस्कृत काव्यशास्त्रातील आनंदवर्धनोत्तर साहित्यसमीक्षेचे प्रतिपादन आहे. प्रतिपादनाचा पूर्वार्ध असा की, मानवी मनात काही शाश्वत भावभावना आहेत. त्या जागत करणे हा वाङमयाचा हेतू आहे. अशा भावभावना जागृत झाल्या म्हणजे वाचक साहित्याशी तन्मय होतो आणि त्याला आनंद होतो. हा काव्यानंद हे वाङमयाचे फल आहे. आणि या समीक्षेचा उत्तरार्ध असा की, रसिकाला येणारा प्रत्यय ही काव्याची, काव्य असण्याची आणि त्याचा दर्जा ठरण्याची कसोटी आहे. मढेकरांचा संस्कृत साहित्यशास्त्राचा फारसा परिचय नव्हता ही गोष्ट खरीच आहे. पण हा परिचय त्यांना रा. श्री. जोग, के. ना. वाटवे आणि द. के. केळकर यांच्या विवेचनावरून झालेला होता. या विवेचनामुळे मढेकरांचे पहिले मत असे बनले की, लौकिक जीवनातील लौकिक-मढेकरांच्या भाषेत सांगायचे तर

६७

ओळख