पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ ( ११) सहकारी कोठ्या मुळे सामाजिक सदुष्णांत भर पडते. (१) सहकारी चळवळींत अंग घालतां तुह्मांला नकळत देशाची सांपत्तिक, औद्योगिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्याचें श्रेय घेतां येते. (२) परस्परांनीं परस्परांची कळकळ, सहानुभूती वाहिली पाहिजे हैं तत्व आपोआप तुमच्या वर्तनांत शिरूं लागर्त. ( ३) सहकारितेने व्यापार करूं लागलें म्हणजे परस्परांवरच्या जबाबदारीमुळे व आपणा एकट्याचें जें नुकसान्तेंच सर्वत्रांचें हैं नेहमी डोळ्यांपुढें असल्यानें मनुप्य नेहमीं जागरूक, धारणी, आगाऊ विचार करणारा, मन आवणारा, सहिष्णु आणि विश्वासयोग्य आपोआप बनूं लागतो. ( ४ ) सहकारितेनें हातांत हात घातल्यावर जुटीनें केवढें कार्य होतें याची कल्पना होऊन मनुष्य संघशक्तीनें काम करण्याची जास्त जास्त हांव धरतो. एकींत बळ व बेकींत छळ याची त्यास पूर्ण ओळख पटते. (५) सहकारितेनें व्यापारांत सचोटी कशी राखावी याचा उत्तम धडा मिळतो. जेथें आपलच दांत व आपलेच औठ असतात तेथें सचेोटीचा अभाव धरून निभणार नाहीं हैं त्यास माहीत होते. (६) सहकारितेनें मनुष्य कर्जविमुक्त होऊन, त्याचें रिणकोपण जाऊन त्याच्या राहणीचा दर्जाश्रेष्ठ होतो. दजी वाजवीपेक्षांफाजील खालावला म्हणजे मनुष्य आपोआप किंवा निरुपायानें दुर्गुणपंकांत रुतत जातो. WS