या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घाईघाईने फळा पुसून टांकावा तसे तिने मनात उगवलेले विचार पुसून टाकले. पण तरीही धुरळा उडालाच. मनात काय काय येऊ लागले.
 तिच्या टेबलावर सहा-सात पत्र कम्प्युटरवर काढण्यासाठी ठेवली होती. संध्याकाळपर्यंत सर्व पत्रांचे प्रिंटआउटस् काढून सरांच्या टेबलावर जायला हवे होते. तिची बोटं सराईतपणे कम्प्युटरवर लयीत नृत्य करू लागली. दुपारच्या सुट्टीत ती आणि मीना डबा खायला बसल्या. तेवढ्यात तिथे नवीन ही टपकला.
 "निरूजी, मैने आपके लिये मेथी और हरी धनियाका ठेपला लाया है, मीनाजी आप भी चखकर देखिये." काहीशा नाटकीपणाने म्हणत त्याने प्लास्टिकच्या पिशवीतून मेथीचे देखणे ठेपले काढले आणि त्यांच्यासमोर ठेवले.
 नवीनच दुकान ऑफिसच्या समोरच आहे. निरूपमाच्याच वर्गातला तो मित्र. दोन्ही घरांचा दाट परिचय. निरूची आई त्यांच्याकडे घरी केलेल्या शेवया, पापड विकायला जात असे. त्या मावशीही नलूताईंना... तिच्या आईला मदतीला बोलवत. ती बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच रमेशशी तिचं लग्न झालं. झटपट लग्न आणि मग वर्षभरात कायमचं माघारपण.
 "नवीन; जिजींना का त्रास देतोस रे? दर चार दिवसांनी काही ना काही आणून समोर ठेवतोस. अरे भी घरी.येऊन भरपेट खाईन ना! जिजी आणि भाऊ का मला परके आहेत? आणि निर्मला बाळाला घेऊन कधी येणारेय इथे? बारसं इथेच की तिकडे? तेव्हा मात्र आठवण ठेवून ये, निमंत्रण द्यायला. निरूने नवीनला बजावून सांगत ठेपल्याचा तुकडा तोंडात टाकला. लगेच तिचं मन धसकलं. आणि ती पटकन म्हणाली, "तुझी गंमत केली हं."
 जिजींच्या सुगरण हातांनी तीळ, मेथी घालून केलेला ठेपला क्षणभरात जिभेवर विरघळला: नवीनने जाताना सप्रयोग पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन येण्याची आठवण दिली.
 ऑफिस संपल्यावर 'मैत्री तुझी माझी' या संस्थेत जाण्यासाठी पाय तयार होत नव्हते. वाटलं, एखाद्या वैराण वाळवंटात फक्त आपणच उभे आहोत. भवतालच्या आठही दिशांच्या क्षितिजापर्यंत कोणीही माणूस नाही. पाय चटचटताहेत. घशाला कोरड पडलेली. चेहेरे नसलेली काळी... विक्राळ भुतं, हवेतून नाचताहेत... ती घाबरून भानावर आली. माथ्यावरचा घाम पुशीत तिनं इकडे तिकडे पाहिलं आणि

कॅलेंडर/११