पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३०२

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

३.] अध्याय १७ वा. 46 " अर्से पाहून महींद्र डुकराचें रूप टाकून ब्राह्मण झाला. कारण ब्राह्मणावर कोणी शस्त्र टाकीत नाही, परंतु एकवीरानें त्याची ती कपटता ओळखून त्याला युद्धाला आव्हान केलें. तेव्हां त्या उभयतांमध्यें भयंकर युद्ध होऊन एकवीरानें महींद्र राक्ष- साधा नाश केला; व त्यानें त्या इंद्राच्या आठ मुलींची सुटका केली. मग एकवीरानें त्या मुलींना आणून विष्णूचे स्वाधीन केलें, व विष्णूच्या कृपेमुळेंच युद्धांत जय मिळाला ह्मणून विष्णूच्या चरणावर मस्तक ठेविलें. विष्णूस एकबीराचा तो पराक्रम पाहून फार आनंद झाला; व त्यांनी त्याला प्रेमानें कुरवाळिलें, इतक्यांत तेथें स्व- गौतून देवेंद्रही आला. त्यानेंही तो एकवीराचा पराक्रम पाहून त्याला आलिंगन दिलें; व नंतर तो आपल्या जयंती, मालती, कुमोदिका, सुशीला, भानुमती, उन्न- तिका, पुष्पावती व चंद्रिका ह्या आठ मुलींना भेटला. मग इंद्र विष्णूला ह्मणाला, 'भगवान् ! हा एकवीर आपला पुत्र आहे, तेव्हां याला मृत्युलोकीं ठेवण्यापेक्षां स्वर्गीत घेऊन जावें, हें बरें. " तेव्हां त्या कन्या ह्मणाल्या “आह्नीं या एकवीराला मनानें वरिलें आहे. तेव्हां आह्मांसह याला स्वर्गात घेऊन चलावें, किंवा आला नेणें नसल्यास याला तरी घेऊन जाऊं नये. " मग विष्णूंनी त्या मुलींबरोबर एकवीराचा विवाह केला; व त्यांना काशीला पाठवून देऊन असे सांगितलें किं, ' आह्मी या एकवीराला वैकुंठांत नेऊन तेथें लक्ष्मीला भेटवून तत्काल तुलांकडे पाठवून देतों, " असे सांगून विष्णु व इंद्र एकवीराला वैकुंठांत घेऊन गेले. तेथें लक्ष्मीची व एकवीर।ची भेट झाल्यावर एकवीराला परत काशीला पाठवून दिलें. त्या एकवीरानें बत्तीस हजार वर्षेपर्यंत सुखानें राज्य करून देह सोडिला. त्या एकवीराचा कृतवीर्य या नांवाचा एक पुत्र होता, त्याचा कार्तवीर्य अथवा ज्याला सहस्रार्जुन ह्मणतात तो पुत्र होय. राजा जन्मेजया या सहस्रार्जुनाची कथा तुला सांगितली आहेच. हा जरी सोमवंशीय होता, तरी हा असुरप्रकृति होता. कारण कृतवीर्यानें आपल्या स्त्रियेशी भलत्याच वेळी संभोग केला होता. अशा काही वेळा असतात की, त्यावेळी स्त्रियांना रतिदान दिल्यास गर्भकोशामध्यें वाईट जीव प्रवेश करितात. त्याचप्रमाणे कृतवीर्याच्या स्त्रियेनें कृतवीर्याबरोबर सायंकाळचे वेळीं संभोग केला, ह्मणून तिच्या वीर्याबरोबर मधु नावाच्या राक्षसानें प्रवेश केला होता. या मधु दैत्यानें पार्वतीच्या सहस्र पार्थिवपूजा मोडल्या होत्या; ह्मणून पार्वतीनें त्याला जन्मोजन्मीं हस्तावयवावांचून जन्म पावशील, ह्मणून शाप दिला होता. पुढे मधु दैत्यानें शंकराला प्रसन्न करून सहस्रमुज होतील, असा वर मिळविला होता, पण पार्वतीनें पुन्हां त्याला असा शाप दिला किं, त्या तुझ्या सहस्र भुजा नारायण अषतार घेऊन तोडून टाकील. " तो मधु दैत्य कृतवीर्याच्या स्त्रियेचे उदरात प्रवेश करून राहिला होता. त्या कृतवीर्याची ती पूर्ण दिवस झाल्यावर 66