पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ [ स्तबक कोणत्या लागले. तेव्हां तो प्रकार पाहून ब्रह्मदेव मोठ्या घोटाळ्यांत पडला. कृष्णाला शरण जावें हे त्याला मुळींच समजेना. सर्व चतुर्भुज असून सर्वांच्याच हातांत शंख चक्र गदा पद्म हीं आयुधें होतीं. सर्वोच्या कंबरेला पीतांबर असून सर्व इंद्रनीलाप्रमाणे सतेज होते. प्रत्येकाच्या गळ्यांत वैजयंती माळा असून सर्वोच्या कंठांत कौस्तुभमणि शोभत होता. सर्वोच्या मस्तकावर मुकुट असून 66 प्रत्येकाच्या कानांत मकराकार कुंडलें डुलत होतीं. असे ते अनंत कृष्ण पाहून ब्रह्मदेव अत्यंत विस्मत झाला व अंतःकरणांत परमेश्वराची झालेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागू लागला. ब्रह्मदेवाची ती अनुकंपनीय स्थिति पाहून श्रीकृष्णास त्याची दया आली भगवंतांनी आपली अनंतरूपें नाहींशी रून ते एकटे "गोप समुहांत दिसू लागले. तेव्हां ब्रह्मदेवाला कांहीं धैर्य उत्पन्न झालें, परंतु प्रत्यक्ष कृष्णाजवळ जाऊन त्याची क्षमा मागण्याचें धैर्य होईना. तेव्हां तेथें नारद आला, व नारदानें ब्रह्मदेवासाठीं श्रीकृष्णाजवळ क्षमा मांगितली. मग श्रीकृष्ण संतोषित होऊन म्हणाले, नारदा ! ब्रह्मदेवाला वृद्धपणामुळे आतां थोडी थोडी भ्रांति पडू लागली आहे असें वाटर्ते, त्याला तुझ्यासारख्या योग्याची सुसंगति आहे म्हणून ही लवकरच सुबुद्धि झाली. " मग ब्रह्मदेव अत्यंत अनुताप दर्शवून भगवंताला म्हणाला, हे अनादि परब्रह्म पुरुषा ! मी खद्यो- •तानें तुला सूर्याला आपला पराक्रम दाखविण्याचा प्रयत्न करून चांगला फजित - मात्र पावली. हे निराकार निर्गुणा ! आज तुझ्या सगूण स्वरूपाचीही मला चांगली ओळख पडली. तूं हें असें सगूण स्वरूप धारण न करितास तर या अनंत पतितांचा उद्धार तरी कसा झाला असता ? तूं जर असे अवतार धारण न करितास तर या भूमीचा भार तरी कोणी हलका केला असता ? हे करुणानिधे ! तूं दुष्टांच्या संहारासाठी आणि साधूंच्या संरक्षणासाठी सदैव तयार आहेस. तुझे अवतार किती आहेत हे जाणावयाला कोणीही समर्थ नाहीं. तूं परब्रह्म ओंकार च नामत्रयाचे जीवित असा आहेस. हे भगवंता ! जो मी केवळ तुझ्या कृपाब- ळानें हैं एवढें विश्व निर्माण करितों त्या तुला मी पामर जिंकावयास पूर्णपणे असमर्थ आहे. मला अपराधाची क्षमा कर. तुझी अतर्क्स शक्ति, विलक्षण लीला- लाघब व अभाधित सत्ता, आज मला चांगली कळून आली. याप्रमाणे ब्रह्म- देवानें श्रीकृष्णाची अनन्य भावानें प्रार्थना करून भगवंताचे चरणावर मस्तक ठेविलें. नंतर कृष्णानें त्याच्या मस्तकावर अभयकर ठेवून त्याला उठ- विलें व सत्यलोकी जाण्यास परवानगी दिली. मग ब्रह्मदेवानें कृष्णाचे स्वाधीन पूर्वीच्या गायी, वांसरें व गोपाळ केले व तेथून निघून गेला. नंतर श्रीकृष्णानें आपल्या अंशापासून उत्पन्न केलेलीं वांसरें, गायी व गोपाळ नाहींसे केले, व ब्रह्मदेवांकडून आलेल्या गोपाळांना गायीगुरांसह आपणाबरोबर घेऊन तो गोकु- कांत गेला. ते गोपाळ घरीं गेल्याबरोबर आपल्या आईबापांनां सांगू लागले कीं, कथाकल्पतरु.