या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हाच सरकारला दुष्काळाची खात्री पटते

परवा सरपंचाच्या म्हशीचा जत्रेत नंबर आला.
बहुदुधी, आखुडशिंगी, कमी चारा खाणारी म्हणून.
...पण ती मात्र रेड्यांच्या टकरी बघून भेदरून गेलेली
त्यांनी आपल्यासाठी भांडावं असं तिला वाटत होतं.
ते मात्र मत्त होऊन मालकांच्या ईर्षेसाठी जिवावर उठलेले एकमेकांच्या.

आपलं म्हैसपण जन्मापासून गहाण असल्याचं ती
जत्रेतल्या म्हशींना हंबरून हंबरून सांगत होती...
पण म्हशी म्हशींची भाषा विसरल्या असाव्यात.
त्यांना फक्त मालकाचं 'हल्या हल्या'च कळत होतं...
नंबरातल्या म्हशीचा म्हैसजागरणाचा प्रयत्न त्यामुळे फोल
ठरत होता... आणि त्याच फोलपटांची पेंड
सरपंच तिला खाऊ घालत होता साळसूदपणे.

म्हशी कधी माणसाळल्या याचं संशोधन करण्यासाठी
यमाच्या रेड्याआधीचे संदर्भ तपासण्यात येतायत
इतक्या गरीब जिवापोटी महिषासुर कसा जन्मला
याचंही संशोधन व्हायला हवं
ज्ञानोबांच्या काळात संशोधनाचं फॅड नव्हतं
नाहीतर त्यांनी महिषामुखी वेदांबरोबरच
रेड्यांचा इतिहासही वदवून घेतला असता.

अनेक सत्ता उलथल्या, राजेरजवाडे लयाला गेले,
संस्थानं विलीन झाली, आता लोकशाही आली, पण...
पण म्हशींना त्या माणसाळल्या तेव्हापासून
एकही आंदोलन करणं आजतागायत जमलेलं नाही,

'लोढणी काढा... कासरा सोडा' अशी साधी घोषणाही

६/कबुतरखाना