या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाजार

बाजार घामेजलेला व्यवहारांनी...
कोणालाच नाही सुतक सोयरेपणाचं
तिथं श्रध्दा किलोवर... प्रेम लिटरवर...
आणि तिरस्कार घनफुटांवर... हवा तेवढा उपलब्ध.. !
प्रत्येकाचा भाव नजरेच्या काट्यावर
फाट्याफाट्यावर तोलून मापून.

ती मातृत्व विकते किंवा देते भाड्यानं
आणि तो मांडतो लिलाव आईचा...
अनेक ठिकाणी महान तत्त्वांचीही बोली लागते
कलून कोकलून

प्रत्येकाजवळचेच 'पाच' चोर
बाजार लुटायला बघतात शिताफीनं
....आणि नंतर पुन्हा चोर ज्याच्या त्याच्या अंतर्यामी,
चोरकप्प्यात आसऱ्याला
.. आणि मग हा बाजारबसवेपणा असह्य झाल्यावर
एखाद्या धनदांडग्या बिलंदराला उचंबळून येते
दातृत्वाची वांती...

पुन्हा उभं राहतं मोठ्ठे धर्मस्थळ
घोंघावतात बाजार, लंपट माश्यांचे थवे होऊन
घामट तीर्थप्रसादावर आंधळ्या श्रध्दावंतांचा
भुरका होऊन....

माझं बरोबर की चूक
पुण्य की पाप...
स्वार्थी चेंगटपणात गुदमरतो जो तो

sasबती अप्रामाणिक कष्टांच्या घामानं ... आणि

कबुतरखाना / ११