या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाडे, वस्त्या आणि अनेक संस्कृती
त्यांनी आपल्या चाहूल न देणाऱ्या गतीनं
सतत गिळत ठेवल्या आहेत.
आम्ही मात्र रोज नव्या परिवर्तनाचे पडघम
जीव खाऊन वाजवतो
तेव्हा आमच्या ढोलावरची काठीसुध्दा
जुन्या अक्षरांच्या चिकट्याची तार धरून
लडबडलेली असते!

आणखी पुढं काही युगं अशीच गेल्यावर
आमच्या वारसांना हातपाय असण्या नसण्याची
आवश्यकताही जाणवणार नाही
...छातीला फुटलेली बोटं की-बोर्ड दाबतील
नाकाच्या भोकांभोवतीचे बुळबुळीत मोठे डोळे
स्क्रीनवर रोखलेले असतील...
आणि मेंदू पोखरणाऱ्या, अक्षरे खाणाऱ्या,
आख्खी संस्कृती गिळत आलेल्या
वाळवीची जागा तेव्हा
व्हायरसांच्या झुंडीच्या झुंडींनी घेतलेली असेल.

१४ / कबुतरखाना