या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आशा

काल मी तुझ्या उरात मेलो

कुणीतरी खणतंय खड्डा
माझ्या कबरीसाठी... तुझ्या उरात

क्षणोक्षणी मी हळुवार जपलेल्या
तुझ्या असंख्य प्रतिमा
खड्डड्याभोवती तटस्थ उभ्या
काळी वस्त्रे पांघरून

माझं श्रांत कलेवर...
शेजारीच पहुडलंय शुभ्र वस्त्रात गुंडाळलेलं
तरीही माझे टक्क उघडे, थिजलेले डोळे
अजूनही निरखतायत तुझा प्रत्येक चेहरा
तुझ्या उरातला गडद अंधार छेदत

त्यांना आशा वाटतेय...
तुझ्या कुठल्यातरी चेहऱ्यावर

दोन अश्रू ओघळतील म्हणून...

कबुतरखाना / १७