या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फॅशन शो

देहाला अवघ्या
 कसले हे साकडे
अंगास डाचते
 वस्त्र तिला तोकडे

भर्जरी नसू दे
 झाक तुझी ती काया
ह्या कुठून आल्या
 साडत काया बाया

ना खंत खेद अन्
 शरम राखली यांनी
बेशर्मीचे फेडले
 क्षितिज कैकींनी

ते झोत उरावर
 उसासुनी चिकटले
बाजार नरांचे
 नारींनी टिचवले

या मिरवत आल्या
 काय कुणा समजेना
या नटल्या की फाटल्या
 तेच उमजेना

मुक्त मी मुक्त आम्ही
 ध्वनी कळसाला पोहोचला
मुक्तीचा चेहरा
 बासनात हरवला.

 

१८ / कबुतरखाना