या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांनीच त्यांच्या तथाकथित वैचारिकतेतून स्वतःच्या आत
उभारलेला असतो स्वतःचा पुतळा.
पुतळेच पोचतात स्वतःच नेमून घेतलेल्या
दैनंदिन कामकाजावर
आणि पुतळेच ठरवतात विल्हेवाट आपल्या कामकाजाची.

संध्याकाळी कामावरून मरगळलेल्या स्नायूंचे
पुतळे आपआपल्या घरी पोचतात

एका घरात
किती वेगवेगळ्या शैलीतले
वेगवेगळ्या कालखंडातले
वेगवेगळ्या भावनांचे
वेगवेगळ्या अभिनिवेशातले
वेगवेगळ्या भूमिकेत
वेगवेगळेच पुतळे एकत्र राहत असतात
त्या प्रत्येक पुतळ्याखालच्या
चबुतऱ्यांच्या एकत्रीकरणाला
समाज म्हणायचं का?

कबुतरखाना / २५