या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

...' पण छ्या ! असलं आपल्या बाच्यानं जमणार नाही.
हां! पण त्याला फक्त स्वर्गाचं दार लांबून दाखवायचं मी कबूल केलंय...
स्वीस बँकेत माझं खातं खोलून द्यायच्या वायद्यावर !'

मी तोंड कधीचंच उघडं टाकलेलं...
वरतीसुध्दा लाचलुचपत चालते?
दोन-पाच रुपयांची चिरीमिरी घेऊन डब्बलशीट सायकलवाल्यांना सोडून
देणाऱ्या पोलिसासारखा
निर्लज्ज हसत यमदूत म्हणाला,
'मृत्युलोकात व्हिजिटसाठी आल्यावर असेच चालते
भत्त्यात भागलं नाही तरी बिघडत नाही
आणि स्वीस बँकवाले
चित्रगुप्ताच्या बापालाही बँक अकौंट दाखवत नाहीत.'

कबुतरखाना / ३१