या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहा हातांचं माकड

गांधीजी, तुम्ही
सत्याग्रह करून
उपोषण करून अहिंसेचा मंत्र देऊन
'चलेजाव'चा नारा देऊन
स्वतंत्र केलेली ही मातृभूमी
आम्ही आता ठराव करून पुन्हा
पारतंत्र्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलीय.
अनैतिक संबंधांच्या सिरीयल्समध्ये
सारे रंक - राव रात्रंदिवस बुडाल्यावर
तुमचा गांधीवाद कुणी समजून घ्यायचा ?
तुमच्या सोज्ज्वळ टोपीखाली आता लफडेबाज मेंदूंनी
बिनदिक्कत आसरा घेतलाय... गांधीजी !

पिझ्झा, बर्गर, कोक आता आमच्या
दारिद्र्यरेषेखालीही मुरू लागलाय
... दिवसा रस्ते झाडणाऱ्या बाईला
'फेक' आंतरराष्ट्रीय कंपनीचे
हजारो डॉलर्सचे बक्षीस लागल्याचे
बोगस मेसेज मोबाईलवर येऊ लागलेयत
आणि ती स्वप्नात मर्सिडीजच्या शोरूममध्ये पोहोचलीय

आमची दमछाक होईल इतकी शून्यं लिहल्यावरही
जो आकडा अपुराच रहावा... असे भ्रष्टाचार
बिनबोभाट होतायत.

आम्ही फक्त आमच्या कुटुंबाच्या नावावरचे

गॅस सिलिंडर पूर्वीप्रमाणेच मिळत रहावेत म्हणून

३२ / कबुतरखाना