या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषा ३

भाषा उभारते प्रतिसृष्टी
तिचं खरं-खोटेपण शोधायचं असतं बोलणाऱ्यांच्या नजरेत

आता नजरेच्या डोहांची हमी नाही
डोहात गाळही काही कमी नाही

'कसं टाकायचं पाऊल पुढं ?'
माझी नजर करुण !
तुझ्या नजरेत अचानकच
तरारते चमक तरुण

नजरेच्या भाषेवर पूर्वी वसंत फुलायचा म्हणे
आता तिथेही नाचत असते बेगडी फुलांचे गाणे

भाषेचा चष्मा लावून आता नजर चोरायची
नातं जपल्याची आपली आपणच समजूत काढायची

४२ / कबुतरखाना