या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"असं ऊन कधी पडलंच नव्हतं!"

"असं ऊन कधी पडलंच नव्हतं!"
माझ्या खापरपणजीची खापरपणजी
जमिनीला टेकणारं सुरकुतलेलं नाक
वर उचलून... भेलकांडतानासुध्दा
सावधपणे दारातनं बाहेर डोकावत
कापऱ्या आवाजात पुटपुटली तेव्हा...

एक मुसाफीर आपला वितळणारा चेहरा
टिचभर रुमालात सावरत सावलीच्या शोधात
लगबगीनं पुढं गेला...
त्याला माझं घर दिसलंच नाही.

बाहेर सगळीकडेच धुरकट पिवळं भगभगीत ऊन
पेटलेल्या वस्त्यांच्या ज्वाळाही उन्हानं गिळून टाकलेल्या
नुसताच जळकट गरम वास सुटलेला
दारातनं बाहेर डोकावत, मी माझ्या खापरपणजीच्या
खापरपणजीला काहीतरी म्हणालो... पण प्रतिसाद शून्य !

लगबगीनं मागं वळून बघतो तर...
म्हातारी कधीचीच गतप्राण झालेली
एक धुरकट पिवळा कॉन्सेंट्रेटेड कवडसा
दात विचकत म्हातारीच्या टाळूवर पडलेला

... म्हातारीच्या टाळूतून 'जुन्या सोन्याच्या' रसाचा गंजलेला
ओघळ उतारानं नागमोडी चाललेला...
मी हवालदिल... काळ सोकावतोय

दूरवर कुठंतरी उमरावाचा एक कलंदर वारस

कसल्याशा धातूची, अशा उन्हापासून बचाव करणारी,

४६ / कबुतरखाना