या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधश्रध्द देव्हारा

हे खिन्न मना,
बाजार तमाचा
ओलांडिसी तू कैसा
तेजाची ठिणगी
विकत घ्यावया
किती मोजशील पैसा

या भिन्न खुणा
सांगती लोक
शोधण्यास जाता पत्ता
आत्म्यांच्या नावे
परमात्म्यावर
भुते चालवित सत्ता

हा छिन्न जुना
पिंजरा डुले
गाण्यावर मत्त पहारा
विकार नांगी
जगण्यावरती
अंधश्रध्द देव्हारा

कबुतरखाना / ४९