या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फॅशन

माझ्या पँटवर
माझ्या बापाच्या लेंग्याची
जरासुध्दा नाही छाप

आणि बापाच्या लेंग्यावर तरी
त्याच्या बापाच्या धोतराचा
कुठं होता ठसा !

फॅशन म्हणजे
संशोधनाचं बायप्रॉडक्ट
रानात हागायला बसावं
आणि सापडावा ससा
फॅशनचा जन्म
अगदी तसा

बटन - गुंड्यांचे कारखाने नव्हते
म्हणून बसायची आज्याच्या धोतराला गाठ
आणि चेनच्या फॅक्टरीनं लावला
बापाच्या बटनगुंड्यांना नाट

स्वाभिमानापोटी देशप्रेमासाठी
विलायती कापड झालं आगीत फस्त
आता त्याच विलायतेत आमची तरुणाई
टॅलेंट विकण्यात व्यस्त

जशी फॅशन येते फिरून फिरून
तसंच विचार-तत्त्वांचं चालायचं समजून
चूक आज बरोबर

कालचं सुख आज अगोचर

कबुतरखाना / ५१