या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौकट डोळ्यात साठवत
मी मिटून घेतो डोळे
तेव्हा माझ्या दडपलेल्या छातीला
श्वासांचे ठोठावणे असह्य होऊ लागते
डोळे आणखी आत आत पाहू लागतात
...आणि आपसुकच
मिटल्या डोळ्यांच्या पापण्याआड
चौकट भव्य भव्य होत जाते
आणि माझं अडगळलेपण
ठिपका ठिपका होऊन जातं... आसमंतात
मग कधी तरी
भोवतीची चौकट लुप्त होते.
आणि मी निराकार
...चौकटींचं वर्तुळ झालेलं
त्या क्षणभर समाधीनं
धीर दिलेला असतानाच...

डोळे उघडता उघडता त्या
वर्तुळाला पुन्हा
फुटू लागलेले

५६ / कबुतरखाना