या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोर


मोर नाचला असा
नाचला असा
नाचला मोर ऽऽ
आषाढ बनावर आले
धावुनी नभ वेडे घनघोर


मनी दाटुनी येतो सांजवेळी
शिशिरामधला मोर
पिसा होऊनी पिसे शोधतो
रानी सांडली दूर
अंधार घालतो मिठी
घुसमटे मोर... अन्
चांदणेही फितूर


झाडाच्या फांदीवरती बसला
सजून पहाटे मोर
ढाळून पिसांचा भार
... शिरशिरे झाड
रानातून असूया साऱ्या
ल्यायले झाड आभूषण
पाचू-हिऱ्यांचा हार

कबुतरखाना / ६३