या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दर्शनाच्या रांगेत...
गैरसमजात चिणून मरण्यासाठी
ज्याच्या त्याच्या धर्मभावनेसकट.

...तरीही देहधर्म
रोज बदलत असतो प्रत्येक धर्म सोयीनुसार
अपेक्षांवर आधारत,
प्रसंगी विज्ञानावर जरब बसवत
विचारांचे खून पाडत,
माणूसपणाचा हक्क हिरावत,
प्रांजळ प्रेमावर बलात्कार घडवत
माणसाला श्वापदांची
तीव्र इंद्रियभू देत
वासना आणि स्वार्थच असतात
कैकदा धर्म... देहधर्मासाठी.

सत्य-असत्य, पाप-पुण्याचे
संदर्भ धूसर होतायत धर्मांध धूळदाणीत
धर्म-अधर्मामधल्या भिंतीही
भुईसपाट क्षणाक्षणाला
आत्म्याचं अमरत्व
धर्मग्रंथात गहाण
आणि धर्माच्या कर्काने ग्रस्त झालेली
सृष्टी रोज देहाला भाग पाडते
धर्म बदलण्यासाठी...
धर्म मोडण्यासाठी आणि
दंभाचा दर्प भपकारत

एकमेकांच्या धर्माधर्मातले झगडे

कबुतरखाना / ६५