या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उन्ह सोनेरी...

उन्ह सोनेरी पडक्या दगडी भिंतीवरती
उन्ह सोनेरी तांबूस हिरव्या पानांवरती

उन्ह सोनेरी नितळ सावळ्या रस्त्यांवरती
उन्ह सोनेरी भिजून थिजल्या वस्त्यांवरती

उन्ह सोनेरी फुरफुरत्या स्थिर पुतळ्यावरती
उन्ह सोनेरी चुळबुळत्या कठपुतळ्यांवरती

उन्ह सोनेरी भिजून थबकल्या पंखांवरती
उन्ह सोनेरी खोल अनामिक डंखांवरती

कबुतरखाना / ६७