या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलांना फुलू दे

फुलांनी फुलायचं
तुम्ही आम्ही खुडायचं
हे काही बरं नव्हे
 फुलांना फुलू दे
 पानांतून उलू दे
 तिच्या केसांत त्यांचं फूलपण
 कशासाठी गुदमरूदे ?
मेल्यावरही फुलांनी हसावं टवटवीत
माळा त्यांच्या प्रेतांच्या माळाव्यात आम्ही घवघवीत...
कशासाठी ?
 फुलांना फुलू दे
 फांदीवर झुलू दे
 हवं तसं डुलू दे
 अन् आकाश, डोंगर, नदी-नाल्यातल्या
 साध्यासुध्या परमेश्वराला
 मोकळेपणानं हसू दे
फुलांना फुलू दे
पानांतून उलू दे
फांदीवर झुलू दे

६८ / कबुतरखाना