या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संध्याकाळ

शब्द - नि:शब्दांच्या वेंधळ्या क्षणी
ती आसमंतभर गोरज उधळत असता
आनंदाने पिसावून...

...तो मात्र
एखाद्या तेजस्वी बलदंड पराक्रमी योद्ध्याने
प्रियेला पाहताच लाजेने थिजून जावे तसा...
मावळतीला आरक्त होऊन घुटमळत असतो.

...नकळत
त्याचे आग ओकणारे हात कनकाचे होऊन जातात
आणि.... तिला हळुवार कुरवाळण्यासाठी...
त्याची नजर अतिव स्निग्ध झालेली असते
तिच्या वक्षांमध्ये चेहरा लपवून घेताना.

...ती त्याला आलिंगन देते स्नेहार्द्र
आणि हळूच लपेटून घेते चांदण टिकल्यांची
अंधाराची शाल भोवताली

कबुतरखाना / ७३