या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुळखुळा

खुळखुळा
वाजत राहिला
हात हालत होते तोपर्यंत

हळूहळू त्यातलं खुळेपण
समजत गेलं
हात हलायचे थांबत गेले

खुळखुळा
वाजायचा बंद होत गेला
डोकी शांत शांत होत गेली

खुळखुळ्याची
टवाळटकळी
आता कोपऱ्यात निरर्थक पडलेली असते.
कधी त्याचा रंग, आकार
आजही भुरळ घालतो...
पण मनात दडलेला त्याचा कर्कशपणा
त्याला हातात घेऊ देत नाही

कधीतरी अचानक कोपऱ्यातला
खुळखुळा जागेवर हलतो वाऱ्यानं
आणि अनाहूत वाजतो लक्षवेधक
...तेव्हा नजरेच्या कोपऱ्यात
आता त्याची अडगळ झाल्याचा भाव असतो...

कबुतरखाना / ८१