या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विसर विसर विसर

तेरवाचे परवाचे कालचे आजचे आत्ताचे सारे विसर
विसर विसर विसर विसर, विसर विसर विसर ।।

विसरण्यासाठीच जन्म आपुला, सोडायची नाही कसर
राग लोभ मोह माया करुणा प्रेम आणिक मत्सर
नको लावूस विसरण्यासाठी श्रध्देचेही स्
विसर विसर विसर विसर, विसर विसर विसर ।।

धर्माची गोची कर्माची नीची वर्माची धच्ची विसर
देवळात जा पाप्यासारखा, देवाला सांग 'निस्तर!'
वाजवून घंटा, बोलून नवस, तोही नंतर विसर
विसर विसर विसर विसर, विसर विसर विसर ||

बांधिलकी विसर, फुशारकी विसर, आत्म्याचा आवाज विसर
सारे बघूनही चाचपडायचेच... दृष्टी होते जशी धूसर
लोकांची 'शाही' घसरगुंडी... आंधळ्या आकांताने घसर
विसर विसर विसर विसर, विसर विसर विसर ||

नकोत नाती खाणारी गोती, मैतर- बैतरांचे अडसर
खोबऱ्यापाठी इकडून तिकडे हात तू बेशक पसर
कायबी कुठंबी कुणीबी कसंबी कुणावर न्हाई असर
विसर विसर विसर विसर, विसर विसर विसर ||

मत विसर पत विसर त्यामुळं झालेली गत विसर
मोठ्ठा धक्का लक्षात पक्का राहतो कुठं ? पडतोच विसर
झुगार सारे सारे जुगार... भुलवणारी कलाकुसर
विसर विसर विसर विसर, विसर विसर विसर ।।

विस्मरणाचा महिमा मोठा... हरघडी पडतो विसर

विस्मृतीच्या गर्तेत बुडाल्या, कैक संस्कृती परस्पर

कबुतरखाना / ८३