या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन निथळे बहर

गंध गंध फूल
मन पाखरू स्वच्छंद

सूर सूर वेळ
मन कान्हाची बंसूर

रंग रंग सांज
मन आत आत दंग


वाजे तुझा पदरव
तिथं आलं माझं मन
तुझ्या पायात पैंजणे
मन झंकारतं गाणं


मन खिडकीचे होता
होते 'आठव' चांदणे
हळू शीतल वाऱ्याशी
माझ्या जुईचे झुल

८६ / कबुतरखाना