या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगामागुनी युगे

'ती आली... ती आली' म्हणता
विरते काठावरती
तिच्या मागुन येते दुसरी
तिला शोधण्यासाठी

ती रेतीत हरवू पाहते
दुसरी तिच्यामागुनी फिरते
पण तिसरी आवेशाने
दोघींना नेण्या येते

त्या दोघींनी अंगावरती
रेती पांघरलेली
तिसरीवरही समुद्रधुनीची
भुरळ पसरली ओली

पण चवथी आली डिवचत
मागून तिसरीच्या तंद्रीला
अन् चौघीजणीही फेर धरोनी
दर्या आधीन झाल्या

हे असे चालले उसळत विरणे
युगामागुनी युगे
त्यांची स्वप्ने घुसळत हळवी
चंद्र नागवा बघे

कबुतरखाना / ८९