हे पान प्रमाणित केलेले आहे.
शि री ष चे
प्र या ण

♣ * * * * * * ♣








 शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रू थांबत ना. “करुणे, किती रडशील ! जाण्याशिवाय गत्यन्तर नाही. पुढे मी तुला नेईन. सुखी करीन.”

 “ पुढे काय होईल, कोणास माहीत ? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची बायको मी शोभणार नाही. माझ्यामुळे तुला कमीपणा येईल. मला न्यायची तुला लाज वाटेल.”

 “ माझ्यावर तुझा विश्वास नाही का ? तुझे प्रेम का मी विसरेन ? तुझे प्रेम बळकट असेल तर ते मला ओढून आणील. ते आपली ताटातूट करणार नाही. उगी. आता उजाडेल. चल, आपण बागेत जरा फिरू. ”

 दोघे बागेत गेली. एक सुगंधी फूल तोडून करुणेने शिरीषला दिले आणि शिरीषने एक फूल तोडून तिच्या केसात खोवले. इतक्यात मित्र प्रेमानंद आला.

 “ ये; प्रेमा, ये.” शिरीष म्हणाला.

 “ शिरीषला नका हो जाऊ देऊ. तुम्ही त्याचे मित्र. शिरीष माझे ऐकत नाही. परंतु तुमचे ऐकेल. सांगा त्याला.” करुणा केविलबाणे म्हणाली.

 “ पत्नीपेक्षा का मित्राचे प्रेम अधिक असते ?” प्रेमानंद हसून म्हणाला.

 “ हो. मित्र सर्वाहून जवळचा.” ती म्हणाली.

 “ करुणे, तू खुळी आहेस. ” शिरीष म्हणाला.

शिरीषचे प्रयाण * १७