पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 'भीष्म - द्रोणा' नंतर भारतीय युद्धातील कौरवपक्षाचा सेनापती कर्ण होतो. मित्र म्हणून दुर्योधनासाठी तो पांडववधाची प्रामुख्याने अर्जुन वधाची प्रतिज्ञा करतो. -कुंतीला हे कळल्यावर ती 'कर्णार्जुन युद्ध' टाळण्याचा प्रयत्न करते पण त्यात तिला यश लाभत नाही. शेवटी युद्धात कर्णाचा वध होतो. कुंतीचा शोक अनावर होतो. 'पहिला पांडव' 'महारथी' असूनही कौरवांचा पक्ष त्याने स्वीकारल्यामुळे • त्याचा नाश झाला. शि. म. परांजपे अशी ही कर्णाची करूण कथा येथे रेखाटण्यांचा प्रयत्न करतात. पण कर्णाच्या स्वभावाचे यथार्थ आकलन न झाल्याने त्यांना नाटककार म्हणून यश लाभले नाही. परांजपे यांचे कर्णचित्रण :- १६ कर्ण सेनापती होतो पण दुर्दैव त्याचा पाठलाग करीतच असते. त्यामुळे या युद्धात त्याची अखेर होते हा भाग 'पहिला पांडव' मध्ये येतो. मात्र धीरोदात्त, कर्तव्यकठोर, तत्त्वनिष्ठ या ऐवजी हा कर्ण उतावीळ, न्यूनगंडाने पछाडलेला परांजपे यांनी चित्रित केला आहे. आपण सूतपुत्र आहोतं पण सेनापतीपद मिळावे यासाठी कोणी आपण क्षत्रिय आहोत असे सिद्ध करणारे आपणास भेटते काय ? या विचाराने हा कर्ण व्याकुळ होतो. १७ सेनापतीपदासाठी हा कर्ण उतावीळ झाला आहे. कर्णाला आकशवाणीच्या आधाराने त्याचे जन्मरहस्य कळते. कुंतीचे शिबिरात आगमन झाल्याने वा स्वतःच्या जन्मरहस्याच्या उलगड्याने त्यांला आश्चर्यही वाटत नाही. उलट तो खोडसाळपणाची शंका घेतो. हा कर्ण एवढा दुबळा आणि भित्रा बनतो की तो स्वतःलाही दूषणे देतो. १८ तो द्रोणाचार्यांचे रक्ताने भिजलेले धड पाहून दचकतो. द्रोणाचार्यांचा वध पाहून तो म्हणतो 'किती हे रक्त अरेरें.' त्याला अभिमन्यूचे दिसणारे भूत, वृषसेनाला रणांगणावर येऊ नये असे सांगणे, कुंतीविषयी पडणारी स्वप्ने यामुळे कर्णाचे 'कर्णपण' हरपते. कर्णवधाची ही शोकान्तिका उत्कट होण्यासाठी 'कर्ण कुंती भेट' नाटककाराने लक्षवेधी बनविली आहे पण संपूर्ण नाटकात कुंतीच्या महनीयतेचा ठसा कुठेच उमटत नाही. कर्णकुंती भेटीच्या प्रसंगी शि. म. परांजपे यांनी या नाटकाच्या दुसऱ्या अंकात केलेले मानवी मनाचे विश्लेषण मोठे मनोवेधक आहे. 'मातृप्रेम की कर्तव्य' या तडाख्यात सापडलेल्या कर्णाची मन:स्थिती, कुंतीच्या मनातील कालवाकालव तीव्रतेने व्यक्त झाली आहे. कुंती म्हणते 'आईच्या अंत:करणाची कल्पना कृष्णा, तुला नाही बरं!' कर्णाचे चित्रणही कुंती प्रमाणेच जिवंत वं लक्षणीय झाले आहे. 'आई, क्षमा कर' म्हणणारा पश्चातापदग्ध कर्ण (पृ. ११२), ४४ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा