पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राधेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा, शल्याला आलिंगण देणारा, मृत्यूला न भिणारा हे सारे प्रसंग कर्णाला मोठेपण देणारे आहेत. हा कर्ण मोठा आहे पण दु:स्थिती त्याचा पाठपुरावा करते. 'या माझ्या देहाला या विश्वासघातकी पृथ्वीने गिळलेले नाही, तोपर्यंत हा कर्ण तुझ्याशी लढणार.' (पृ. १११ ) एकंदरीत महाभारतातील कर्णापेक्षा परांजपे यांचा हा 'पहिला पांडव' वेगळा आहे. त्यात काही कल्पना कर्णाच्या मनाचे औदार्य व मोठेपणा सूचिक करणाऱ्या असल्यातरी परांज्यांनी रेखाटलेले कर्णाचे नेभळे, विकृत चित्रण महाभारतीय कर्णाच्या तुलनेत आणि कलांतर्गत न्यायात समर्थनीय ठरत नाही. या कर्णचत्रणातून स्वत:च्या मनातील कल्पना राबविण्यापलिकडे फारसे काही व्यक्त होत नाही. मानवी मनाचे आणि जीवनाचे सामर्थ्य महाभारतातील कर्णाच्या जीवन-संघर्षातून जे व्यक्त होते ते येथे प्रत्ययाला येत नाही. याचा अर्थ महाभारतातील कर्णाप्रमाणे शि. म. परांजपे यांचा कर्ण मित्रप्रेम, शौर्य, औदार्य, नीचपणा, दुष्टपणा, इत्यादी गुणदोषांविषयी अजोड ठरत नाही.' १९ महारथी कर्ण : निर्मितीचे प्रयोजन:- औंधकरांच्या 'महारथी कर्ण' या नाटकात कर्णाच्या जीवनातील शोकनाट्याच्या " चित्रणापेक्षा 'कुमारी माता आणि तिचा पुत्र' हे प्रमेय नाटकात मांडावे असा नाटककारांचा प्रधान हेतू दिसतो. “या निर्दय जगात निरपराध कुमारी मातांना मुक्तकंठाने जनात रडायला सुद्धा वाव नाही, म्हणून निर्लज्जपणानं मृत्यूला कवटाळायला ही कुंती आता उद्युक्त झाली आहे. कुमारी मातेला जवळ करणारा मृत्यूवाचून मायाळू कुणीच नाही, म्हणून 'कर्ण ह्या कुंतीचा पुत्र आहे, अशी सगळ्या ● कौरवपांडवांच्या शिबिरात कंठरवानं, निर्लज्जपणानं आकांत करीत नितांत मृत्यूला कवटाळणार आणि माझ्या कर्णार्जुनांचं युद्ध थांबवणार ! "२० कुंतीने मोठ्या उद्विमतेने हे उद्गार कृष्णाजवळ काढले ते नाटकाच्या प्रयोजनावर प्रकाश टाकतात. कर्णाजवळ बोलतांना ही कुंती म्हणते, “बाळा, रूढीच्या निष्ठुर तडाख्यात सापडलेली आपण मायलेकरं आहोत!.' निरपराध कुमारी मातांना आणि तुझ्यासारख्या कुमारी मातांच्या निरपराध लेकरांना समाजात दयेचं स्थान नाही, म्हणून जगात आपले कसे धिंडवडे निघत आहेत, आपापसात एकमेकांचे हे असे गळे कापण्याचे प्रसंग निर्माण होत आहेत ...... अशा वेळी कर्णा, दुष्ट रूढी जळो. पण आपल्यासारख्या हतभागी मायलेकरांनी तरी एकमेकांकडं सद्यतेनं प्रेमळपणानं जिव्हाळ्यानं पाहायाला नको का ?" २९ या कुंतीच्या उद्गारातून हाच निर्मितीचा हेतू स्पष्ट होतो. कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ४५