पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अधकरांचे स्वतंत्र चिंतन :- महाभारतातील कर्णकथेच्या चिंतनातून औंधकरांना जे प्रतीत झाले ते त्यांनी 'महारथी कर्ण' मधून व्यक्त केले आहे. कुमारी मातांच्या प्रश्नावर आणि रूढीवर औंधकरांनी आपले लक्ष केंद्रित केले असले तरी ते भावोत्कटतेने कर्णजीवनातील प्रसंगांकडे पाहतात. कालभेदाचा प्रश्न त्यांनी गौण मानला. २ 'नाटकें ही प्रामुख्याने मनोरंजनाची साधने आहेत.' हीच औंधकरांची भूमिका येथेही आहे. कर्णाच्या राज्याभिषेक प्रसंगाने औंधकरांनी या नाटकाची मोठी औचित्यपूर्ण सुरूवात केली आहे. पार्थांचाही पार्थ शोभणारा हा कर्ण शकुनीमामांना स्पष्ट शब्दांत खडसावतो, 'बस करा मामा ही तुमची स्वाभिमानशून्य चतुराई !' नुसत्या कोल्ह्याच्या चतुराईनं सर्वच कार्यभाग साधता, तर जगांत सिंहाची निपजच झाली नसती. २३ कर्णाचा शकुनी मामावरील हा हल्ला त्याच्या शौर्याला साजेसा आहे, अधिक उजाळा देणारा आहे. कर्णाच्या जीवनात दुर्योधनाला 'उपकर्ता' म्हणून विशेष स्थान आहे या निमित्ताने येथे सामाजिक विषमतेवर भाष्य येते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक विषमतेच्या संदर्भात औंधकरांनी ' जाणले आहे. २४ त्यांनी पुढे कर्णाच्या व्यक्तित्त्वाच्या गाभ्याला स्पर्श केल्यामुळे, कर्णाला निव्वळ प्रतिनिधि स्वरूप प्राप्त होत नाही तर एक 'माणूस' म्हणून जिवंतपण लाभते, 'जर प्रतिकूल परिस्थितीत सावरले तर अनंतकाळ ते हृदयात कोरले जाते.' कर्णाच्या हृदयात दुर्योधन असेच हे स्थान मिळवू शकला. यामागे दुर्योधनाचा हेतू मोठा शुद्धच होता असे नाही, आपल्या शत्रूचा शत्रू म्हणून तो मित्र होऊ शकतो. अशी दुर्योधनकर्णांची मैत्री जुळली आहे. 'जगांत जन्मापेक्षा गुणांवरूनच माणसाची योग्यता ठरली गेली असती, तर कितीतरी यातनांचा नाश झाला असता.' कर्णाच्या निमित्ताने मराठी साहित्यिकांनी एक महत्त्वाचा विचार येथे व्यक्त केला आहे. त्यांनी 'मदायत्तं तु पौरुषम्' हे सूत्र कर्णाच्या जीवनातून शोधले आहे. करुणमूर्ती कर्ण :- औंधकरांच्या या नाटकात कर्ण आणि कुंती यांच्या हृदयांत चाललेल्या खळबळीचे अंतर्द्वद्वाचे हृद्य आणि परिणामकारक चित्रण रेखाटलेले आढळते. कर्णाने 'कर्तव्यनिष्ठा की कुलक्षय ?" ह्या द्वंद्वातून कर्तव्यनिष्ठा स्वीकारून आपली सुटका करून घेतली. या 'नाटकात वर्णिलेले कर्णाचे व कुंतीचे चरित्र इतके करूण व हृदयस्पर्शी आहे की, जरी हे पौराणिक नाटक असले तरी, एखाद्या सामाजिक नाटकाइतकेच जिव्हाळ्याचे वाटते. ' ४६ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा