आनंद वाटतो. हिंदुस्थानांतील नयन-संस्कृति पूर्ण विकसित झालेली आहे. इटलीबद्दल असेंच म्हणतात. सौंदर्य पहावयास डोळे दिलेले आहेत. हिंदुस्थानांतील प्राचीन मूर्तिपूजेने डोळ्यांपासून हृदयाला जाऊन मिळावयास अत्यंत जवळचा रस्ता शोधून काढला आहे. सरळ व समीपवर्ती रस्ता. या रस्त्यानें अनेक गेले, अनेक जात आहेत. या मूर्तिपूजेचें महत्त्व विश्वव्यापक आहे. तिची हांक सर्व हृदयांना ऐकूं जाते. चित्र नेहमीं आपली भाषा बोलतें, आपली कथा सांगतें, न चुकतां सांगतें व ती भाषा सर्वांना समजते. तुमची बोलण्याची भाषा कोणतीही असो. तुम्ही सुशिक्षित असा वा नसा, चित्र तुमच्या हृदयाजवळ बोलेल. आपलें घर नेमकें सांपडावें म्हणून उंबऱ्यांत दिवा लावून ठेवून नदीवर गेलेली गृहिणी, तुळशीजवळ लावून ठेवलेला दिवा, सायंकाळी सूर्यदेव मावळला म्हणजे गायींचें घरीं गोठ्यांत येणें, अशा प्रकारचे देखावे जर रंगवले गेले, चितारले गेले, तर सर्व भारतीयांच्या हृदयांना एकच संदेश दिला जाईल, कला म्हणजे सर्वांना समजणारी भाषा, सर्वांची भाषा; राष्ट्राची पुनर्रचना करतांना, राष्ट्राचें मंदिर, मातृ-मंदिर पुन्हां उभारतांना या सर्वसामान्य भाषेचें फार महत्त्व आहे. या कलेचेंही पुनरुज्जीवन झालें पाहिजे. पुनर्जीवन म्हणण्यापेक्षां, पुनर्जन्म म्हणण्यापेक्षां, पुनर्जागृति म्हणणें युक्त होईल. कारण हिंदुस्थानांत कलाविकासाचीं महान युगें अनेकदां येऊन गेलीं व तीं मेलीं असें म्हणतां येणार नाहीं. ज्या काळांत हत्ती खोदले गेले, त्या काळांत हिंदुधर्माची संघटना होत होती. सर्व पृथक्करणांतून एकता निर्माण होत होती. अर्वाचीन यथार्थवादी चित्रकलेइतकेंच अजिंठ्याच्या सुंदर चित्रकलेत माधुर्य व कौशल्य आहे. कला स्वतंत्र होती, जिवंत होती, सृष्टीचें बारीक बारीक नाजूक रूप
पान:कला आणि इतर निबंध.pdf/१८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
१५