दर्शविणें, सृष्टींतील अनंत कोमल छटा दर्शविणें, वगैरे गोष्टी त्या कलेला उत्कृष्ट साधल्या होत्या. सांची, अमरावती, गांधार, येथें शिल्पकलेची आणखी उत्क्रांति होत गेली. मधून मधून पुन्हां कलेला उत्साहाचे पूर येत होते. मुसलमानी अमदानींतही स्वतंत्र कलेचा विलास व विकास चाललाच होता. कलेचा आकार बदलला, बाह्यरूप बदलले; परंतु अंतरात्मा बदलला नाहीं. भारतांतील कला अनुकरण करणारी झाली नव्हती; ती स्वतःची सृष्टि निर्माण करणारी होती. मुसलमानी काळांत शिल्पकलेला नवीन वळण मिळालें. कलेचा आत्मा नवीन शिल्पकलेत प्रकट होऊं लागला.
या सर्व काळांतील विशिष्ट शक्ति व प्रतिभा हीं आज आपण आपलीशी करून घेतलीं पाहिजेत. हें राष्ट्रीय युग आहे. प्राचीन काळांतील सर्व उत्कृष्ट तें घेऊन पुढे जावयाचें अशी ही वेळ आहे. भूतकाळाशीं नीट संबंध जोडून घेणें यांतच नवीन विजयाची किल्ली आहे. ज्याला भूतकाळ नाहीं, त्याला भविष्य नाहीं. जेथें पाया नाहीं तेथें कळस नाहीं; तेथें शेंडा नाहीं. भांडवलाशिवाय व्यापार कसा करणार? अर्वाचीन विद्यार्थ्यानें ही गोष्ट ध्यानांत धरली पाहिजे— भूल करून चालणार नाहीं. एकाएकी विशाल, विराट संसार पाहण्याचा कठिण, परंतु भव्य, दिव्य प्रसंग त्याच्यावर आला आहे. या दिव्यांतून यशस्वीपणें त्याला पार पडावयाचें आहे. आपल्या लोकांनीच निर्माण केलेल्या गोष्टींतील कल्पनाशक्तीनें त्याची दृष्टि, त्याची शक्ति आज बांधली गेलेली नाहीं. तो स्वतंत्र आहे. पूर्वजांप्रमाणे स्वजन- निर्मितिबद्ध नाहीं. ईजिप्तच्या कलेची ग्रीक कलेशीं तो आज तुलना करूं शकेल. मध्ययुगीन इटालियन व डच कलेची अर्वाचीन फ्रेंच कलेशी तुलना करूं शकेल. आजूबाजूची विशाल सृष्टि पाहून त्यांतील आपले स्थान तो ओळखील व त्याची सृष्टि जास्त विशाल, स्वतंत्र व मुक्त होईल. स्वतःचें
पान:कला आणि इतर निबंध.pdf/१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
कला आणि इतर निबंध