पान:कला आणि इतर निबंध.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
कला आणि इतर निबंध
 

 जो भारतीय शिल्पकार ओरिसांतील कोरलेले दगडी दरवाजे नीट अभ्यासील, जो दक्षिण हिंदुस्थानांतील गोपुरांचे, प्रचंड मंदिरांचे ते चांदीचे दरवाजे अभ्यासील, त्याच्या सौंदर्यशास्त्रांची अशी महान् भाषा मिळाली असें म्हणतां येईल. त्या भाषेत जेव्हां तो बोलेल, त्या वेळेस सर्व भारतास ती भाषा समजेल व भारताच्या बाहेर भारतीय शिल्पकलेचा अभ्यास केलेले जे असतील त्यांच्याजवळही ती भाषा बोलेल. या भाषेतच त्याला निर्दोष व अव्यंग रीतीनें, पूर्णतेनें बोलतां येणें शक्य आहे; कारण ही भाषा त्याला स्वतःला पूर्ण माहीत आहे. या भाषेतील प्रत्येक रेषा, प्रत्येक बांक, प्रत्येक वळण, त्याला माहीत आहे; परंतु युरोपमधील मध्ययुगांतील गॉथिक धर्तीची खिडकी खोदतां येईल का? ओरिसांतील दरवाजा तो खोदील; परंतु गॉथिक वातायन त्याला दाखवतां येणार नाहीं, निर्माण करतां येणार नाहीं. तो स्वभूमींतील उत्कृष्ट शिल्पकार आहे, नीट अभ्यास केलेला विद्यार्थी आहे; परंतु परकीयांच्या पद्धतीचा पुरस्कार करतांना तो चुका करील. कधीं कधीं तर पाश्चिमात्य कलेचें अनुकरण करूं जातां तिचें तो पतन करील, ती हास्यास्पद करील. ज्यांनीं गॉथिक शिल्पकलेचा अभ्यास केलेला आहे, त्या वातावरणांत जे मुरलेले आहेत, त्यांच्या दृष्टीनें भारतीय शिल्पका निर्माण केलेला गॉथिक नमुना हास्यास्पद ठरेल! परकी कलेचें अनुकरण करणारा खरी परकी कला दाखवूं शकत नाहीं. भारतीय शिल्पकार पूर्वी नसलेली गॉथिक कला दाखवील, ज्याप्रमाणें इंग्लिश किंवा जर्मन अनुकरण करणारे भारतीय वस्त्रांतील पूर्वी नसलेला असा नमुना दाखवतील. अन्योन्य म्हणतील कीं, "असा गॉथिक नमुना पुढे होईल- परंतु मागें नव्हता;" "हा भारतीय अनुभव नाहीं, हें दुसरेंच कांहीं आहे." चित्राचीसुद्धां याप्रमाणें भाषा असते. चित्रकलेतही शब्द आहेत. अनंत शब्दांचें, त्या