पान:कला आणि इतर निबंध.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
२५
 

झाली. जो पाश्चिमात्य कला जाणतो व खोल पाहतो, तो मान हलवतो; नाही, नाही, असें म्हणतो; ही स्तुति योग्य नाही, असें तो मानेने सांगतो. सृष्टींतील खरें सौंदर्य, परमोच्च लावण्य हे लपलेलें असतें; तें आध्यात्मिक असतें; तें सापडत नाही, पकडतां येत नाही; इंद्रियांच्या पकडींतून तें निसटतें. सृष्टीचें खरें सौंदर्य आत्म-सौंदर्याप्रमाणे आहे. ग्रीककलेतलि अत्यंत मनोरम असें चित्र अत्यंत मनोहर असा नमुना मीं जो पाहिला, तो ज्याला हेन "मिलोची प्रिय रमणी" असे वर्णितां झाला तो नव्हे; हंसावर बसून चालणारी एक कुमारी. मला हें दृश्य अत्यंत सुंदर वाटलें. केस नीट घट्ट बांधलेले, शारीरिक सौंदर्य विलासापेक्षा विशुद्धता दर्शवणारें, जणु उषाबालाच चालली आहे कोणी, असें वाटतें. हा कलावान् केवळ शारीरिक सौंदर्य पाहणारा नाही, केवळ हात, पाय, शिरा यांत सौंदर्य भरून राहिलें आहे, असें मानणारा तो नव्हता; तर सर्वत्र सौंदर्य पाहणारा होता; एकच सौंदर्य परंतु तें अनेक रूपांनी उभे राहतें; तीं अनंत रूपें तो पाहणारा होता.
 आजच्या कलोपासकांना, कलाभ्यासकांना मी जें सांगत आहें, तें कदाचित् श्रद्धार्ह वाटणार नाही; मी जें सांगत आहें, तें त्यांना पटणार नाही; तरी पण मी सांगतें कीं, हिंदु गतधवेचा खिन्न चेहरा, त्या चेहऱ्यावरील शरणागति दर्शवणारें स्मित, चेहऱ्यावरील सर्वव्यापी दुःख, ती करुणा हें चित्र काढणें जास्त उदात्त आहे; काढण्यालायक आहे हें चित्र; आणि कठीणही आहे. धनयौवनमत्त, धष्टपुष्ट प्रमदांचीं व युवकांचीं चित्रे काढण्यापेक्षा हें गंभीर चित्र काढणें किती कठीण व किती उदार! मायकेल एंजेलोचें जें सुप्रसिद्ध मॅडोनाचें चित्र त्याबद्दल अनुभवी व तज्ज्ञ युरोपियन चित्रकलाप्रेक्षक टीकाकार म्हणतात की, त्या चित्रांतही सुंदर