बद्ध, सुंदर, सामर्थ्ययुक्त, वाटोळा— त्याच दृष्टीने अजिंठ्याच्या गुहेत चितारणाऱ्या त्या कलावानाने पाहिला होता; आणि मध्यकालीन कॅथोलिक चित्रकार आत्म्याला ज्या तऱ्हेने पहात— प्रार्थना पिळवटून निघत आहे हृदयांतून— त्या वेळच्या आत्म्याचें दर्शन तेहि या चित्रकाराला झाले होतें. त्या चित्रकाराने पाश्चिमात्य व पौर्वात्य कलांचें मधुर मिश्रण केलें होतें. देह व आत्मा, बाह्य व आंतर— उभय प्रकारचें सौंदर्य पाहणारे त्याचे डोळे होते. या अशाच तऱ्हेने भावी भारतीय चित्रकला विकसित होत गेली पाहिजे; अशाच रीतीने तिने सौंदर्य प्रगट केले पाहिजे. भारतवर्षाने दोन महान् वस्तु दिल्या आहेत. कलेचा अभ्यास करणाऱ्याला दोन देणग्या दिल्या आहेत. मानवी आकार जाणणे, ओळखणें व उत्कट भावना कशा प्रतिबिंबित होतात, प्रकट होतात, विशेषतः पूजेमध्यें व प्रार्थनेमध्ये प्रकट होतात, तें जाणून घेणें, या दोन गोष्टी भारतांत सर्वत्र पहावयास मिळतील!
जर भारतीय चित्रकलेंत देह व मन, दोघांचें सौंदर्य रेखाटण्याची शक्ति आहे, तर मग पाश्चिमात्य कलेच्या मागे भारतीय कलापूजक कां जातो? काय मोहनी त्याला पडते? माझ्या मतें तरी एकच आकर्षण आहे. प्रत्येक वैयक्तिक कलावंताला युरोपने स्वातंत्र्य दिलें आहे. युरोपमधील कला ज्ञातिविशिष्ट, जातिविशिष्ट नाही. वाटेल त्याने कलेचें उपासक व्हावें, युरोपमध्ये कला म्हणजे वंशपरंपरागत धंदा नाही. अर्वाचीन काळीं तरी कला म्हणजे तेथे जणु भाषाच झाली आहे. या जगाबद्दलचे आपले विचार थोर विशालबुद्धि पुरुष कलेच्या द्वारें बोलून दाखवतात. कला म्हणजे जणु काव्याचाच एक प्रकार व म्हणून ज्याला ज्याला स्फूर्ति असेल, त्याला त्याला ती मोकळी आहे; स्फूर्तिने कोणीही तिला वरावें;
पान:कला आणि इतर निबंध.pdf/३०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
२७