पान:कला आणि इतर निबंध.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
कला आणि इतर निबंध
 

 जें जें महनीय आहे. दिव्य-स्तव्य आहे, धगधगीत आहे, तें उत्कट ध्येयांचे भक्त असे जे विद्यार्थी त्यांच्या हृदयांत जन्म घेत असतें. उत्कट, भावनोत्कट विद्यार्थी जमले त्यांचा संघ बनला तर ते महत् निर्माण करतील, कांहींतरी दिव्य करून दाखवतलि; उज्ज्वल निर्माण करतील. जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर जेव्हा मानवजातीची निश्चितता होते, त्यांतील कांहीं प्रश्नांसंबंधी तरी जेव्हा निश्चित निर्णय केला जातो, तेव्हा मग ते लगेच एकत्र येतात. जगाला हालवणाऱ्या गोष्टी व घटना या अनेक गुरु घडवून आणीत नाहीत अनेक सेनापति लढाई मारूं शकत नाहींत. एक अपूर्व प्रतिभावान् व्यक्ति, व बाकीचे अनुयायी. शिष्य, किंवा अनेक तरुण एकत्र धडपड करणारे अशा रीतीनेच शक्ति प्रकट होत असते अशा वृंदांतून, संघांतून सामर्थ्य निर्माण होत असतें, हें सिद्ध करावयास आपणांस फार दूर जावयास नको. कलकत्ता शहरांतील गेल्या ५०-७५ वर्षांतील चळवळींकडे पाहिलें, तरी ही गोष्ट दिसून येईल. कलकत्त्यांतील चळवळींचा आरंभ, त्यांचें बीज केशवचंद्रसेन व तत्कालीन विद्यार्थी यांच्यामध्ये आहे. केशवचंद्रांच्या काळांतील विद्यार्थ्यांनी आपणांस नैतिक शिक्षणाच्या थोर, निर्विवाद बळाने संपन्न असा नवविधान संघ दिला; निर्भयपणें व निःस्वार्थपणें प्रत्येक प्रगतिपर पावलाचें समर्थन करणारा साधारण ब्राम्हो समाज दिला व रामकृष्ण मिशन दिलें.
 दुसऱ्या देशांतही अशा अनेक घटना दाखवून देतां येतील. अशा संघटनेंतून चांगलें बाहेर पडेल, वाईटही बाहेर पडेल; परंतु चांगलें वा वाईट संघद्वाराच बाहेर पडेल. ज्या वेळेस लॉर्ड कर्झन ऑक्सफर्ड येथे शिकत होता, त्या त्याच्या विद्यार्थीदशेत साम्राज्यवादाच्या ज्या कल्पना