या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भगिनी निवेदिता
[ अल्प-परिचय ]
[ अल्प-परिचय ]
भगिनी निवेदिता यांचें नांव पुष्कळ नवभारतीयांस माहीत नसतें. ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांजवळ मी निवेदितादेवींचें नांव काढलें, त्या त्या वेळेस ते विचारीत, 'या निवेदिता कोण ?' ज्या विदुषीनें ब्रह्मचारिणी राहून भारताची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली, तिचें नांव माहीत नसणें ही कृतघ्नता आहे. दुःखाची गोष्ट ही कीं, या थोर सेविकेचें नीटसें चरित्रही कोणी लिहिलें नाहीं. ज्या बंगालमध्ये राहून त्यांनीं सारें जीवन दिलें त्या बंगाली भाषेतही त्यांचें सविस्तर चरित्र नाहीं. एक लहानसें पत्रकवजाच चरित्र आहे. असो.
भगिनी निवेदिता यांचें मूळचें नांव मार्गरेट ई. नोबल असें होतें. विवेकानंदांची व त्यांची इंग्लंडमध्ये भेट झाली. अमेरिकेत अद्भुत विजय