ठेवला. मार्गरेटची समाधि लागली. कित्येक वेळाने ती शुद्धीवर आली. अपार आनंदांत चुबकळून जणुं ती बाहेर आली. थोर अनुभव!
हिंदुस्थानांत राहण्याचें ठरलें. मार्गरेटचें नांव निवेदिता ठेवण्यांत आलें. निवेदिता म्हणजे अर्पण केलेली. निवेदितेनें आपल्या जीवनाचा भारतास नैवेद्य दाखविला. श्रीरामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या चरणीं तिनें जीवन वाहिलें. निवेदितादेवी आपल्या प्रत्येक लेखाचे खालीं "श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांची निवेदिता" असें लिहीत.
विवेकानंद १९०२ मध्ये समाधिस्थ झाले. निवेदिता क्षणभर स्तिमित झाल्या; परंतु त्यांच्या जीवनांत प्रकाशाचा अमर दीप लावला गेला होता. विपन्न भारत समोर उभा होता. अन्नहीन, वस्त्रहीन, ज्ञानहीन; स्वातंत्र्यहीन, असा हा महान् भारत त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्याच्या सेवेस त्या उभ्या राहिल्या.
हिंदुस्थानाला त्यांनीं आपलें मानलें. तुम्हांआम्हांला ही भरतभूमि आपली वाटत नसेल, इतकी ती निवेदितादेवींस वाटे. आपला हा देश, आपले बंधु, अशा शब्दांनीं त्या हिंदुस्थानचा व हिंदी जनतेचा उल्लेख करीत. जणुं त्या हिंदुस्थानांत जन्मावयाच्या; परंतु चुकून तिकडे गेल्या.
१९०० च्या सुमारासच प्लेगही हिंदुस्थानांत पसरत होता. कलकत्त्यासही ही साथ गेली होती. निवेदितादेवींनी खूप सेवा केली, कलकत्ता शहरांतील गल्ल्यांतून फार घाण असे. निवेदितादेवी झाडू घेऊन गटारे व रस्ते साफ करीत. एक इंग्रज तरुणी सहा हजार मैलांवर येऊन भारतीयांचे रस्ते साफ करूं लागली. आज मिराबाई तेंच करीत आहेत; परंतु आम्ही हिंदी जनता काय करीत आहोत?
महर्षि सेनापति वापट नेहमीं म्हणत असतात की, या देशांत दोन
पान:कला आणि इतर निबंध.pdf/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३