इतिहास, कला, यांवर त्यांनी किती लिहिलें ? भारताचा आत्मा त्यांनी दाखविला. भारतीय कलांवरील त्यांचे लेख अमुपम आहेत. त्यांनी स्वतः युरोपियन चित्रकला व शिल्पकला यांचा मार्मिक अभ्यास केलेला होता. स्वतः युरोपांतील उत्कृष्ट चित्रसंग्रहालयें व शिल्पसंग्रह पाहिले होते. भारताचीही यात्रा करून मंदिरें, लेणीं, गुंफा, मशिदी, किल्ले, सर्व त्यांनीं सहृदयतेनें, भावभक्तीनें व मार्मिकतने पाहिलें होतें. भारतीय इतिहासाचा व कलांचा त्यांना किती अभिमान! भगवान् बुद्ध, अशोक, अकबर, राणाप्रताप, शिवछत्रपति, चांदबिबी, अहल्याबाई, वगैरे नांवें आठवतांच त्यांची समाधि लागे. एकदां त्या बुद्धगयेला गेल्या होत्या. येथें भगवान् बुद्धास ज्ञान झालें, हा विचार मनांत येऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा चाहूं लागल्या. तेथून जातांना तेथील एक दगड त्यांनी बरोबर नेला. तेथील अणुरेणु त्यांना पवित्र वाटत होत्या. तो दगड त्यांच्या टेबलावर असे. त्या दिल्लीला गेल्या होत्या. तेथील खुदाबक्ष ग्रंथालयांत शहाजहान चें हस्ताक्षर आहे. शहाजहान, मुम्ताज व ताजमहाल या तीन वस्तूंबद्दल निवेदितादेवीस फार वाटे. शहाजहानचें तें हस्ताक्षर पाहून त्यांचें हृदय उचंबळले. पत्नीची पवित्र स्मृति बाळगणारा, ताजमहाल बांधणारा शहाजहान त्यांच्या डोळ्यांसमोर आला. त्यांनी तेथील व्यवस्थापकास विचारलें, "मी या कागदाला क्षणभर हात लावू का?" त्यांना परवानगी मिळाली. त्यांनी त्या हस्ताक्षराला हात लावला व डोळे मिटून उभ्या राहिल्या. ताजमहालचे स्वप्न पाहणाऱ्या शहाजहानच्या काळांत जणुं त्यांचा आत्मा जाऊन आला.
हिंदुस्थांनांतील अणुरेणूबद्दल, हिंदी वस्तूबद्दल, हिंदी इतिहासाबद्दल असें प्रेम कितीकांस आहे? आपण स्वतःला भारतीय म्हणवतों, परंतु
पान:कला आणि इतर निबंध.pdf/९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६