या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कार्यकर्तालक्ष्मी नेता वेगळा असतो.त्यांचा सगळा भर सहकाऱ्यांना मदत करण्यावर,गटातल्या सान्यांना समान वागणून देण्यावर, सर्वांना समान संधी देण्यावर आणि अत्यंत लवचिक राहण्यावर असतो. आपल्या सहकाऱ्यांवर संपूर्ण म्हणजे संपूर्ण विश्वास टाकून त्यांना भरघोस पाठिंबा देणं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सहकान्यांना बरं वाटेल आणि त्यांना त्यांच्या कामात मजा येईल अशा गोष्टी करण्यावर या कार्यकर्तालक्ष्मी नेत्याचा भर असतो.
 कार्यलक्ष्मी आणि कार्यकर्तालक्ष्मी नेता.काही नेत्यांमध्ये दोन्हीचं मिश्रण असतं तर काही 'चिंटू' नेते ह्यातले कुठलेच गुण नसलेले अल्पायुषी नेते असतात.

 तुम्ही पाहा आसपास.तुमचा नेता कसा आहे ते आणि तुम्हीच असाल एक नेता तर तपासा मग स्वत:लाच.

१२३ । कार्यशैली