या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'कार्यशैली' हे एक निमित्त आहे. मन ओळखणे, वृत्ती जोखणे आणि मनोवृत्ती तपासणे हे खरं काम आहे. माणूस वागतो तर असाच का वागतो. तसा का वागत नाही? माणूस असं वागताना, बोलताना त्याच्या मागे कुठल्या गोष्टी घडत असतात? अशा प्रश्नांचा शोध म्हणजे 'कार्यशैली'चा अभ्यास.
 'कार्यशैली'चा शोध म्हणून वर नाही, आत आहे. खोलवर आहे. दुसऱ्याची कार्यशैली' पाहताना आपण दुसऱ्याला नाही, स्वतःलाच तपासतो आहे.

अनिल शिदोरे

३२, नटराज सोसायटी. कर्वेनगर, पुणे-४११०५२ फोन-०२०-२५४४३१३४