या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५६. नियोजनाचे प्रकार


 दोन प्रकारचं नियोजन असतं. एक म्हणजे 'नियोजनाप्रमाणे सर्व होणार नाही' असं मान्य करून घोटाळा होणारच आहे, असं गृहीत धरून केलेलं नियोजन आणि दुसरं म्हणजे संपूर्ण सखोल, परिपूर्ण तयारी करून फक्त पाच टक्के घोटाळा किंवा आकस्मिक संकटांना गृहीत धरून केलेलं नियोजन. एक प्रकार म्हणजे घोटाळ्याचं नियोजन आणि दुसरा प्रकार म्हणजे 'तयारीचं नियोजन'.

 नियोजनाचे हे दोन प्रकार आहेत आणि कुठला एक प्रकार चांगला आणि एक प्रकार वाईट असं म्हणता येणार नाही, कारण हे नियोजन कुठल्या परिस्थितीत आपण करतो आहोत,ते करायला आपल्याकडे काय साधनसामग्री आहे आणि जिथे आपण लढतो तिथलं रणांगण कसं आहे. ही गोष्ट अतीव महत्त्वाची आहे. घोटाळ्याच्या नियोजन प्रकारात लढाई लागल्यावर समोर येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता आवश्यक असते, तर तयारीच्या नियोजनात प्रत्यक्ष लढाईच्या अगोदरची कवायत, समोर असणारं नेमकं उद्दिष्ट, पुरेसा वेळ आणि हातात असणान्या साधनसामग्रीचा नेमका अंदाज असणं गरजेचं. असो, कुठलाही प्रकार असला तरी मात्र नियोजन हे आवश्यक असतं यात शंकाच नाही.

७७। कार्यशैली